Maharashtra Police News | ‘…अजूनही वेळ गेलेली नाही’, रोहित पवारांचा अजित पवार गटातील आमदारांना अल्टीमेटम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी (Rebellion) केल्यानंतर पक्षातील अनेक आमदार (MLA) अजित पवार यांच्या गटात समील झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. राष्ट्रवादीमधून अजित पवारांचा गट वेगळा झाल्यानंतर या गटातील नेत्यांकडून शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो बॅनरवर लावला जात आहे. (Maharashtra Police News) यासंदर्भात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी दिला होता. यानंतर देखील अनेक नेत्यांकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाष्य करताना अजित पवार यांच्या गटातील आमदारांना अल्टीमेटम दिला आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही…

रोहित पवार म्हणाले, अजित पवार गटाकडून फोटो वापरण्याबाबत शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे.
ज्या ठिकाणी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मोठ्या सभा होतात,
तिथून त्यांनी शरद पवारांचा फोटो वापरणं बंद केलं आहे.
परंतु आमदारांना माहिती आहे शरद पवारांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत.(Maharashtra Police News) त्यामुळे आमदारांकडून स्थानिक स्तरावर शरद पवारांचा फोटो लावला असावा. ज्यांना पदं मिळाली, मंत्रीपद मिळाली, जे आज सत्तेत आहेत, ते कदाचित शरद पवारांना विसरले असतील. पण अनेक आमदार अजून शरद पवार यांना विसरले नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही, असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीत एकच अध्यक्ष

पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या एकच अध्यक्ष आहेत,
ते म्हणजे शरद पवार. आता अजित पवार गटाला निवडणूक आयोगाबाबत (Election Commission) आत्मविश्वास आहे,
त्यांना वाटतं की निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे, ते बरोबरच आहे. निवडणूक आयोग त्यांच्या बाजूने निर्णयही देईल.
पण सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) अजूनही न्यायाच्या बाजूने म्हणजेच आमच्या बाजूने असल्याचे
रोहित पवारांनी सांगितले.

आमच्याकडे पवार साहेब आहेत…

आमचा लढा मोठा आहे. आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह असलं काय आणि नसलं काय… आमच्याकडे शरद पवार साहेब
आहेत. शरद पवारांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर आणि लोकांना विश्वासात घेऊन आम्ही आमचा लढा लढू.
आगामी निवडणुकांमध्ये भाजप (BJP) आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांचा अहंकार आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही,
असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kangana Ranaut | देशाचे नाव ‘भारत’ की ‘इंडिया’ या वादामध्ये कंगना राणौतची उडी; म्हणाली, “इंडिया या नावात प्रेम दाखवण्यासारखे काय आहे?…”