‘कोरोना’ लसीसाठी मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अनिवार्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 16 जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना लसीकरण( India corona vaccination) सुरू होत आहे. यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना लसीकरणासाठी सरकारने को-विन (Co-win) अ‍ॅप लॉन्च केले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे लसीकरण केले जाईल आणि त्यात लसीशी संबंधित सर्व माहिती असेल. दरम्यान, को-विन अ‍ॅप अद्याप प्ले-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले नाही.

कोरोना लसीसाठी आधारशी मोबाइल क्रमांक लिंक असणे अनिवार्य
कोरोना लसीकरणासाठी सरकारने आधार क्रमांकाशी मोबाइल नंबर जोडणे बंधनकारक केले आहे. म्हणजेच तुम्हाला कोरोना लस पाहिजे असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असावा. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट झाले नाही की, लोकांना स्वत: चा त्यांना मोबाइल नंबर आधारशी लिंक करावा लागेल कि, कॅम्प लावून सरकार हे काम करेल. अधिसूचनेत केंद्र सरकारने सर्व राज्यांना लोकांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी जोडण्यास सांगितले आहे जेणेकरुन लसीकरणासाठी एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मोबाईल नंबरला आधारशी जोडण्याचा मार्ग
दरम्यान, आपण स्वतः आपला मोबाइल नंबर आधारशी लिंक करू शकत नाही. यासाठी आपण आपले आधार कार्ड घ्यावे आणि आपल्या मोबाइल नंबर प्रदाता कंपनीच्या जवळच्या स्टोअरमध्ये जावे आणि मोबाइल नंबरसह आधार लिंक करण्यास सांगावे, हे सर्व स्टोअरमध्ये शक्य होणार नाही. मोबाईलशी आधारशी लिंक करण्याचे काम त्याच स्टोअरमधून केले जाईल ज्या अधिकृत पॉईंट ऑफ सेल (पीओएस) आहेत.

आधार मोबाईल क्रमांकाशी जोडलेला आहे की नाही हे कसे कळेल ?
सरकारच्या आदेशानंतर 2018 मध्ये कोट्यवधी लोकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केले होते. जर तुमचा मोबाईल नंबर आधीचाच असेल तर तुम्हाला आता आपला नंबर आधारशी लिंक करण्याची गरज नाही. तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांनी यापूर्वीच मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक केलेला असेल, पण आपला नंबर आधारशी लिंक झाला आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आधारच्या वेबसाईटवर जाऊन व्हेरीफाईड मोबाईल नंबरमध्ये जाऊन चेक करू शकता. यासाठी My Aadhaar> Aadhaar Services >Verify Email/Mobile Number या स्टेप्स फॉलो करा.