Aadhaar Seva At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवर आधार सेवा केंद्र; रेल्वे स्टेशनवर आधार कार्डबरोबर दुरुस्तीही करता येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aadhaar Seva At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवर आता आपण नवीन आधार कार्ड (Aadhar Card) तसेच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करु शकतो. रेल्वे स्टेशनवर आधार केंद्राची सुविधा देणारे पुणे रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे विभागातील (Central Railway Division) पहिले रेल्वे स्टेशन आहे.

 

पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक रेणु शर्मा (Renu Sharma) यांनी आरक्षण कार्यालयातील आधार केंद्राचे उद्घाटन केले.
यावेळी अपर व्यव्यवस्थापक बृजेश कुमार सिंह (Brijesh Kumar Singh), प्रकाश उपाध्याय (Prakash Upadhyay)
तसेच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे (Dr. Milind Hirve), डॉ. रामदास भिसे आदि उपस्थित होते.

 

या आधार केंद्रावर प्रवासी तसेच पुणे शहरातील नागरिक नवीन आधार कार्ड तसेच आधार कार्डावरील पत्ता, फोन नंबर,
आदि बदल दुरुस्त करु शकणार आहेत.
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे केंद्र सुरु असणार आहे.
यु आय डी ए आय याच्या सहयोगाने रेल्वेने हे आधार केंद्र सुरु केले आहे.

 

Web Title : –  Aadhaar Seva At Pune Railway Station | Aadhaar Seva Kendra at Pune Railway Station Repair can also be done with Aadhaar card at the railway station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा