Pune Rain | वरसगाव धरणही १०० टक्के भरले; पुणे जिल्ह्यातील १० धरणे १०० टक्के फुल्ल, खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेक विसर्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rain | सतत सुरु असलेल्या पावसाने खडकवासला धरण (Khadakwasla Dam) प्रकल्पातील पानशेत (Panshet Dam) पाठोपाठ वरसगाव धरण (Varasgaon Dam) १०० टक्के भरले असून खडकवासला धरणही १०० टक्के भरले असल्याने मुठा नदीत सध्या १८ हजार ४९१ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहरात पूर आला आहे. खडकवासला धरण साखळीत एकूण पाणीसाठा ९५.७८ टक्के झाला आहे. त्यामुळे आता यापुढे जोराचा पाऊस झाला तर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागणार आहे. त्याचा परिणाम पुढील दोन महिन्यात शहराला कायम पूराचा धोका संभवतो. (Pune Rain)

 

पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १० धरणे १०० टक्के भरली असून माणिकडोह (Manikdoh Dam) आणि येडगाव (Yedgaon Dam) ही दोन धरणे वगळता इतर सर्व धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत.

 

उजनी धरण (Ujani Dam) १०० टक्के भरले असून भीमा नदीत ६० हजार क्युसेक, कालव्यात २३०० क्युसेक, पॉवर हाऊससाठी १६००, बोगदा ९००, निरा माढा उपसासाठी २५९ क्युसेक असा एकूण ६५ हजार ५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

 

जिल्ह्यातील उजनी तसेच भाटघर (Bhatghar Dam), वीर (Veer Dam), कळमोडी (Kalamodi Dam), चासकमान (Chaskaman Dam), आंद्रा (Andhra Dam), वडीवळे (Vadivale Dam), खडकवासला, पानशेत, वरसगाव अशी १० धरणे १०० टक्के भरली आहेत. मुळशी धरण (Mulshi Dam) ९९.८३ टक्के भरले असून धरणातून मुळा नदीत ९३१५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पवना धरण (Pavana Dam) ९६ टक्के भरले असून धरणातून २०७० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. (Pune Rain)

गुंजवणी (Gunjwani Dam) ९९ टक्के, कासारसाई (Kasarasai Dam) ९५,
पिंपळगाव जोगे (Pimpalgaon Joge Dam) ९१, माणिकडोह ९५, येडगाव ६४, वडज (Vadaj Dam) ९४,
डिंभे (Dimbhe Dam) ९३, घोड (Ghod Dam) ८०, विसापूर (Visapur Dam) ८९,
चिल्हेवाडी (Chilhewadi Dam) ७६, भामा आसखेड (Bhama Askhed Dam) ९४ टक्के भरली आहेत.

 

 

Web Title :- Pune Rain | Varasgaon dam also filled 100 percent; 10 dams in
Pune district are 100 percent full, 18 thousand cusec discharge from Khadakwasla dam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा