Sudhir Mungantiwar | ‘वंदे मातरम्’ वरुन मुनगंटीवारांचा यूटर्न? शासकीय निर्णयावर म्हणाले-‘केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा असं मी म्हटलं नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्याच्या (Independence Day) अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsav) सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शासकीय कार्यालयात (Government Office) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणावं, असं आवाहन केलं होतं. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या या आवाहनामुळे वाद निर्माण झाला होता. यावरुन आता मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी हॅलो ऐवजी फक्त वंदे मातरम् हाच शब्द वापरा, असं म्हटलेलं नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

 

इंग्रजांकडून किंवा परदेशातून आलेल्या हॅलो शब्दाऐवजी वंदे मातरम् शब्द वापरावा, असं अभियान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाने सुरु केलं आहे. वंदे मातरम् ऐवजी कुणी राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा तोडीचा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. हॅलो शब्द रझा अकादमीसाठी (Raza Academy) देशभक्तीला प्रेरणा देणारा असेल, तर प्रश्न उपस्थित होत नाही. आम्ही असा कोणताही कायदा केलेला नाही, असं सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

 

वंदे मातरम् हे स्वातंत्र्यवीरांच्या ओठांवरचे पवित्र शब्द आहेत. एका कवीने फार छान लिहिलंय, देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रा पेक्षा स्वातंत्र्यवीरांच्या तोंडून निघालेले वंदे मातरम् हे शब्द आमच्यासाठी प्राणप्रिय आणि पवित्र आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा कायदा केला जात नाही. भारत माता की जय किंवा वंदे मातरम् म्हणायचं की नाही? हे रझा अकादमीने ठरवावं. पण महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोक हॅलो या शब्दाला पर्यायी शब्द वंदे मातरम् वापरत असतील तर रझा अकादमीला कोणता शब्द वापरायचा आहे? हे त्यांनी ठरवावं, असेही मुनगंटीवार म्हणाले.

रझा अकादमीने हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला विरोध केला होता.
तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही यावर टीका केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसैनिक फोन केल्यावर जय महाराष्ट्र म्हणतात.
आता मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना काय म्हणायचं ते विचारावं, असा टोला भुजबळ यांनी लगावला होता.

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | bjp leader sudhir mungantiwar statement on vande mataram compulsion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा