कामाची बातमी ! जाणून घ्या Aadhaar-Voter ID लिंक करण्याच्या 3 सर्वात सोप्या पद्धती, SMS ने सुद्धा होईल काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar-Voter ID | केंद्रीय मंत्रालयाने एक निवडणूक सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. जे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक (Aadhaar-Voter ID) करेल. तुम्ही राष्ट्रीय मतदार सेवा वेब, SMS, मोबाईल फोनवर किंवा क्षेत्रातील बूथ लेव्हल ऑफिसरला भेट देऊन मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करू शकता. हे काम घरबसल्याही करू शकता, कारण ते खूप सोपे आहे. याच्या तीन सोप्या पद्धती जाणून घेवूयात…

 

1. वेबसाइटद्वारे आधार आणि मतदार ओळखपत्र कसे लिंक करावे :

स्टेप 1 : अधिकृत पोर्टल voterportal.eci.gov.in वर जा

Step 2 : मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि मतदार आयडी क्रमांक वापरून लॉग इन करा

स्टेप 3 : तुमचे राज्य, जिल्हा, नाव, जन्मतारीख आणि वडिलांचे नाव यासारखे वैयक्तिक तपशील नोंदवा

Step 4 : स्क्रीनवर दर्शविलेल्या ’फीड आधार क्रमांक’ पर्यायावर क्लिक करा

स्टेप 5 : आधार कार्ड क्रमांक, मतदार आयडी क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेल पत्ता नोंदवा

Step  6 : ’सबमिट’ बटणावर क्लिक करा.

 

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही आयडी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

2. अशाप्रकारे आधार आणि मतदार ओळखपत्र एसएमएसद्वारे लिंक करा :

स्टेप 1 : फोनवर Messages अ‍ॅप उघडा

Step 2 : या फॉरमॅटमध्ये एक संदेश टाइप करा

स्टेप 3 : 166 किंवा 51969 वर एसएमएस पाठवा. आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक प्रक्रिया सुरू होईल. (Aadhaar-Voter ID)

 

3. बूथ-लेव्हल ऑफिसरद्वारे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करा :

स्टेप 1 : जवळच्या बूथ लेव्हल ऑफिसशी संपर्क साधा आणि लिंकिंगसाठी अर्ज मिळवा.

Step 2 : अर्ज भरा आणि बूथ लेव्हल ऑफिसरकडे सबमिट करा.

स्टेप 3 : तपशीलांची पडताळणी केल्यानंतर बूथ अधिकारी अतिरिक्त पडताळणीसाठी तुमच्या ठिकाणी येईल.

Step 4 : पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

 

 

Web Title :- Aadhaar-Voter ID | link your aadhaar card to voter id card via website sms or via booth level officer check step by step process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात आणखी घट तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | 17 वर्षीय युवकाचा गोळ्या झाडून खून, पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील घटना; सर्वत्र प्रचंड खळबळ

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुधीर रामचंद्र आल्हाटला अटक; माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध FIR