Aadhar Update | आधार बनवण्यासाठी आता होणार नाही दगदग, UIDAI ने केली ही घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhar Update | आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे तुमच्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा बँकेशी संबंधित कोणतेही काम असो, जवळपास सर्वच ठिकाणी ते मागितले जाते. प्रत्येक क्षेत्रात आधारची गरज वाढत आहे, त्यासंबंधित समस्या सोडवण्यासाठी त्या संख्येत आधार सेवा केंद्र (Aadhaar Seva Kendra) नाहीत. आता ही बाब लक्षात घेऊन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक मोठी योजना आखली आहे. याअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये शेकडो केंद्रे उघडली जाणार आहेत. (Aadhar Update)

 

53 शहरांमध्ये 114 केंद्रे उघडणार

UIDAI ने देशातील 53 प्रमुख शहरांमध्ये एकूण 114 आधार सेवा केंद्रे उघडण्याची योजना तयार केली आहे. देशातील सर्व मेट्रो शहरे, सर्व राज्यांच्या राजधानी आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही आधार सेवा केंद्रे उघडली जातील. सध्या देशात कार्यरत असलेल्या आधार सेवा केंद्रांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची एकूण संख्या फक्त 88 आहे, जी वाढवण्याची तयारी केली आहे. (Aadhar Update)

मात्र, सेवा केंद्रांव्यतिरिक्त, देशभरात 35,000 हून अधिक आधार केंद्रे आहेत, जी बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारे चालवत आहेत.

 

रविवारीही काम करतात केंद्रे

नवीन आधार कार्ड (New Aadhar Card) बनवायचे असो किंवा त्यात कोणतेही बदल करायचे असोत, तुम्ही या आधार सेवा केंद्रांद्वारे आठवड्यातील सातही दिवस सेवा घेऊ शकता. म्हणजेच साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही ते सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरळीतपणे उघडते. या आधार सेवा केंद्रांमध्ये वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जातात.

 

आधार अपडेट फी

आधार नोंदणी – मोफत
बायोमेट्रिक अपडेट – 100 रुपये
नाव, पत्ता, जन्मतारीख – 50 रुपये
मुलांचे बायोमेट्रिक – मोफत

 

जास्त शुल्क आकारल्यास येथे करा तक्रार

जर तुम्ही एखाद्या आधार केंद्रावर अपडेट (Aadhar Update) साठी गेलात आणि तेथे निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रकमेची मागणी होत असेल, तर अशावेळी संबंधितांकडे तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही uidai.gov.in वर मेलद्वारे किंवा टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

 

Web Title :- Aadhar Update | uidai will open 114 aadhaar seva kendra in 53 major cities of india know about fee and timing

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा