Ramdas Athawale | ‘मनसेचा भाजप आघाडीला कोणताच फायदा नाही’ – रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे आणि भाजपची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांत युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आगामी पालिका निवडणुकीसाठी (Municipal Elections) मनसेने पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याने युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईत मनसे (Mumbai MNS) सर्व जागा म्हणजे 227 जागांवर उमेदवारी देणार असल्याचे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सांगितले. दरम्यान मनसे-भाजप युतीबाबत (MNS-BJP Alliance) केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना विचारले असता त्यांनी मनसेला खोचक टोला लगावला. रामदास आठवले (Ramdas Athawale) आज औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अत्याचार झालेल्या दोन दलित व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. प्रितमकुमार शेगावकर (Adv. Pritam Kumar Shegaonkar) यांचे चिरंजीव प्रशांत शेगावकर (Prashant Shegaonkar) यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आठवले आज शहरात आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप-मनसे युतीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मनसेचा भाजप आघाडीला कुठलाही फायदा नाही. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) युतीला कुठलाच फायदा नाही, असे म्हणत त्यांनी मनसेसोबतच्या युतीला विरोध दर्शवला.

शिंदे गट (Shinde Group) हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेनेची सत्ता संपवणे हे आमचे लक्ष्य असून त्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. कारण भाजप, रिपाइंसह (RPI) आता शिंदे यांची खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. सतत भूमिका बदलणारे मनसेचे राज ठाकरे यांची आम्हाला गरज नाही, त्यांनी आमच्याकडे येऊ नये, असेही रामदास आठवले म्हणाले.

 

60 वर्षात काँग्रेसला (Congress) भारत जोडता आला नाही,
आता राहुल गांधी (Rahul Gandhi) काय भारत जोडणार? असा टोला आठवले यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर लगावला.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यास उत्सुक आहोत.
शिर्डीमध्ये माझ्याविरुद्ध अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे माझा पराभव झाला, असेही आठवले यांनी सांगितले.

 

Web Title :- Ramdas Athawale | mns chief raj thackeray is of no use to the alliance ramdas athawales sarcasm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘हॅलो चंद्रकांतदादा…’ भर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना फोन

 

Vedanta-Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे भूमिपूजन कधी झाले, फोटो दाखवा, आशिष शेलारांचे शिवसेनेला चॅलेंज

 

Bad Cholesterol | ‘या’ गोष्टी जलद वाढवतात कोलेस्ट्रॉल, आजपासूनच सोडून द्या अन्यथा येऊ शकतो हार्ट अटॅक!