लांब दाढी-पगडीमध्ये आमिर खानला ओळखणं झालं कठीण, लालसिंग चड्ढाचा पहिला लुक ‘लीक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खाननंतर आता ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटामधून आमिर खानचा पहिला लुक लीक झाला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल झालेला फोटोत आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ च्या लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B4sOO7aBB7f/?utm_source=ig_embed

आमिर खान आणि करीना कपूर स्टारर फिल्म लाल सिंग चड्ढा हा सर्वाधिक प्रलंबित चित्रपट आहे. नुकताच करीना कपूर खानचा या चित्रपटाचा फर्स्ट लूक लीक झाला होता. करीना नंतर आता आघाडीचा अभिनेता आमिर खानचा फर्स्ट लूकदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/aamir_khan/status/1191958729375277056

सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या फोटोत आमिर खान लालसिंग चड्ढाच्या लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे. फोटोत त्याने फिकट जांभळा शर्ट-ग्रे पँट घातली आहे. आमीर खानने जांभळ्या रंगाची पगडीही बांधली आहे. सरदार लूकमध्ये दिसणारा आमिर खान ओळखणे कठीण आहे. सध्या चंदीगडमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

https://www.instagram.com/p/B4pe4XTjK8y/?utm_source=ig_embed

करीना कपूर खानच्या लीक झालेल्या फोटोत अभिनेत्री देसी लूकमध्ये दिसत आहे. करीना कपूरने सलवार सूट परिधान केला आहे. यापूर्वीही करीना कपूर आणि आमिर खान यांनी ‘3 इडियट्स’ आणि ‘तलाश’मध्ये काम केले आहे. आमिर-करीनाची केमिस्ट्री दोन्ही चित्रपटांत चांगलीच पसंत पडली होती.

आमिर खान लालसिंग चड्ढा चित्रपटाद्वारे 2 वर्षानंतर पडद्यावर परत येत आहे. त्याचा आधीचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ होता. आता त्याचा लालसिंग चड्ढा 2020 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. हा चित्रपट टॉम हँक स्टारर हॉलिवूड फिल्म ‘फॉरेस्ट गंपचा’ रिमेक आहे. अद्वैत चंदन हे लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !