…म्हणून आमिर खान ‘बिग बी’ अमिताभची लेक श्वेताला दरवर्षी लिहितो पत्र !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लेक श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan-Nanda) लाईमलाईटपासून दूर आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर मात्र ती कायमच ॲक्टीव्ह असते. अलीकडेच श्वेताचा भाऊ अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यानं खुलासा केला की, श्वेता सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) या दोन अभिनेत्यांची खूप मोठी फॅन आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का आमिर खान श्वेताला दरवर्षी पत्र लिहित असतो. खुद्द अभिषेकनंच याचा खुलासा केला आहे.

कॉफी विथ करण या शोमध्ये बोलताना अभिषेकनं श्वेताबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. जेव्हा सलमान खानचा मैने प्यार किया सिनेमा रिलीज झाला तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कुलमध्ये होती. तिनं हा सिनेमा व्हिसीआरवर पाहिला होता. त्यांच्या शाळेत सिनेमा पाहण्यास परवानगी नव्हती. त्यामुळं हा सिनेमा ऑडिओ कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून घेतला होता आणि ती कॅसेट ऐकायची. यावेळी श्वेतानंही सिनेमा रेकॉर्ड करून घेतल्याचं सांगितलं. ती सलमानची मोठी चाहती असल्याचंही तिनं यावेळी सांगितलं.

इतकंच नाही तर कार्यक्रमात बोलताना तिनं ती आमिर खानची फॅन असल्याचंही सांगितलं. यावेळी अभिषेकनं सांगितलं की, श्वेता आमिर खानचीही फॅन होती. जेव्हा आमिर खानला याची माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला. त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा. आमिर खान आणि श्वेता बच्चन यांचा वाढदिवस लागोपाठ असल्यानं तो मला पत्र लिहित असावा हेही एक कारण त्यावेळी श्वेतानं सांगितलं.

आमिर खानचा वढदिवस 14 मार्चला आणि श्वेता बच्चन हिचा वाढदिवस 17 मार्चला असतो.

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो द बिग बुल आणि बॉब बिस्वास अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे. नुकताच तो ब्रीद या वेब सीरिजमध्ये आणि लूडो या सिनेमात काम करताना दिसला आहे.