अमीर खानची लाडकी ‘इरा’नं रेड गाऊनमध्ये केलं ‘BOLD’ फोटोशुट, ट्रोलर्स म्हणाले- ‘जंगल में मंगल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आमीर खानची लेक इरा खान जरी सिनेमांपासून दूर असली तरी ती आपल्या फोटो किंवा व्हिडीओला घेऊन सोशलवर चर्चेत असते. नकुतीच ती आपल्या बोल्ड फोटोशुटमुळे चर्चेत आली होती. यानंतर इरानं पुन्हा एक असंच बोल्ड अवतारातील फोटोशुट केलं आहे. या फोटोमुळे इरा ट्रोल होताना दिसत आहे.

इरानं रेड कलरच्या बॅकलेस ऑफ शोल्डर गाऊनमध्ये नुकतंच एक फोटोशुट केलं होतं. यातील काही फोटो तिनं इसंटाग्रामवरून शेअर केले होते. या फोटोत इरा सुंदर दिसत होती. काहींनी तिचं कौतुकंही केलं आहे. परंतु या फोटोशुटमधील एका फोटोमुळे काहींनी तिला ट्रोल केलं आहे.

https://www.instagram.com/p/B6Fig1BAmES/

एका ट्री हाऊसपाशी झाडावर उभी रहात इरानं एक फोटो क्लिक केला होता. ऑफ शोल्डर आणि बॅकलेस रेड कलरच्या गाऊनमध्ये इरा खूप बोल्ड दिसत होती. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये इरा म्हणाली होती की, “मला एक ट्री हाऊस हवं होतं.” काहींनी या फोटोचं कौतुक केलं. तर काहींनी ट्रोल केलं. एकानं कमेंट केली जंगल में मंगल. आणखी एकानं चिमटा काढत म्हटलं, उडी मारू नको.

https://www.instagram.com/p/B49XZgbAV75/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/