Aamna Sharif | अभिनेत्री आमना शरीफने फंकी अँड कुल मधील फोटो केले शेअर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील मालिका ‘कही तो होगा’ मध्ये कशिशच्या भूमिकेत अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) घराघरात पोहोचली होती. आमनाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला छोट्या पडद्यापासून सुरुवात केली आहे. आमनानी आजवर टीव्ही बॉलीवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत असा प्रवास केला आहे. आमनानी (Aamna Sharif) तिच्या अभिनयाची सुरुवात 2003 साली ‘कही तो होगा’ या मालिकेतून केली होती. आमना अनेक चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये ही झळकली आहे. आमना ‘आधा इष्क’ या वेब सिरीजमध्ये देखील दिसली होती. नुकतेच आमनानी शेअर केलेले फोटोज सध्या चर्चेचा विषय बनत आहेत.

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकांवर भुरळ पाडणाऱ्या आमनाचे आज अनेक चाहते आहेत. आमनाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही कूल फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये तिने हटके लूक शेअर केले आहे. सध्या तिचे हे लूक चाहत्यांना घायाळ करत आहेत. या फोटोमध्ये आमनाने टी-शर्ट ओवर शर्ट आणि जीन्स असा कॅज्युअल लुक केला आहे. आमनाचा हा ग्लॅमरस आणि स्टायलिश आवतार सर्वांनाच भावला आहे. चाहत्यांनी कमेंट करत तिचे कौतुकही केले आहे.

2009 साली आलेल्या ‘आलू चाट’ या चित्रपटातून आमनाने (Aamna Sharif) बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आमना या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदसानीसोबत झळकली होती. आमनाने काही काळ अभिनयातून देखील ब्रेक घेतला होता. यावेळी ती तिच्या खाजगी आयुष्यावर लक्ष केंद्रित करत होती. यानंतर 2014 साली आमना ‘एक विलन’ या चित्रपटात रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

 

Web Title :- Aamna Sharif | bollywood aamna sharif looking gorgeous in funky cool look biography filmography

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो