राम मंदिरासाठी जमीन खरेदीत 16.5 कोटी रुपयांचा घोटाळा? आप खासदार संजय सिंह यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) यांनी राम मंदिर (Ram temple) बांधकामासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन प्रकरणात 16.5 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. संजय सिंह यांनी रविवारी म्हटले की, राम मंदिर बांधकामासाठी अगोदर एक जमीन 2 कोटी रुपयात एका अन्य व्यक्तीने खरेदी केली. केवळ 10 मिनिटानंतर तिच जमीन राम मंदिर ट्रस्टने 16 कोटी रुपये जास्त मोजून 18.5 कोटी रुपयात खरेदी केली. आप खासदाराने म्हटले की, हा रामभक्तांच्या भावनांशी केलेला खेळ आहे आणि पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष दिले पाहिजे. या घोटाळ्यासाठी त्यांनी राम मंदिर निर्मिती ट्रस्टचे वरिष्ठ पदाधिकारी चंपत राय (Senior office bearer Champat Rai) यांना जबाबदार ठरवले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) यावर कोणतीही थेट टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. संघटनेने म्हटले आहे की ते सर्व आरोपाचे कागदपत्र एकत्र करून सत्य शोधून काढतील.

तर, संजय सिंह (Sanjay Singh) यांनी खरेदी-विक्रीचे काही कथित कागदपत्र (Documents) दाखवत म्हटले की, रवि मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी (Ravi Mohan Tiwari, Sultan Ansari) नावाच्या दोन व्यक्तींकडून जमीन खरेदी करण्यात आली. रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रानुसार यासाठी त्यांना दोन कोटी रुपये देण्यात आले. परंतु त्याच दिवशी केवळ 10 मिनिटात हिच जमीन 16 कोटी रुपये जास्त देऊन राम मंदिर ट्रस्टने खरेदी केली. यावरून स्पष्ट होते की, जमीन खरेदीत मोठी अनियमितता झाली आहे. त्यांनी हा रामभक्तांच्या भावनांशी खेळ असल्याचे सांगत मागणी केली की, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यानुसार या प्रकरणात अयोध्याचे (Ayodhya) मेयर सुद्धा साक्षीदार आहेत, यासाठी या प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी. तत्पूर्वी माजी सपा नेते पवन पाण्डेय (Former SP leader Pawan Pandey) यांनी सुद्धा सीबीआय आणि ईडीच्या (CBI, ed) चौकशीची मागणी केली आहे.

 

विश्व हिंदू परिषदेने म्हटले…

आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या या आरोपानंतर जेव्हा विश्व हिंदू परिषदेला (विहिप) प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार (National President Alok Kumar) यांनी सांगितले की.
त्यांना नुकतीच मीडियाकडून ही माहिती समजली आहे. ते प्रकरणाचे सर्व कागदपत्र मागवत आहेत.
यावर अभ्यास करून योग्य टिप्पणी करू.

Wab Title :- aap mp sanjay singh alleges of scam of rs 16 crore in land purchasing for the construction of ram temple in ayodhya

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा