आर.आर. पाटील यांचे नाव घेतलं अन् मिळाला 40 कोटी जास्तीचा निधी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा नियोजन निधीसंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच पुण्यात घेतलेल्या बैठकीतील एक किस्सा सध्या खूप चर्चिला जात आहे. बैठकीत दिवंगत गृहमंत्री आर. आर. आबा यांचे नाव घेताच सांगली जिल्ह्याला घोषित केलेल्या निधीपेक्षा 40 कोटी रुपयांचा निधी जास्तीचा देण्यात आला आहे. त्यामुळे आबाच्या नावाच्या जादूचा प्रत्यय दिसून आला.

बैठकीत अजित पवार यांनी सांगली जिल्ह्याला 280 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र जिल्ह्याने 315 कोटींची मागणी केली होती. 280 कोटींचा निधी ऐकून आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, अधिकारी नाराज झाले होते. पवारांनी ओळखले त्यानंतर पवार पुढे म्हणाले, आबांच्या जिल्ह्यावर मी अन्याय केला, असे व्हायला नको म्हणून आणखी 20 कोटी देत आहे. चला 300 कोटींना मंजूरी द्या असे ते म्हणाले. त्यानंतर अजित पवारांनी आर. आर. आबांचे नाव घेताच त्यांचे जिवलग मित्र आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे आबांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्याकडे पाहत म्हणाले की, अजितदादा तुम्ही आबांचे नाव घेतलंच आहे आणि वहिनी देखल येथे आहेतच. जिल्ह्याला 320 कोटींचा निधी मंजूर करावा, अशी आर. आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांची इच्छा आहे. यावर अजितदादांनी त्यांची मागणी मान्य केली व सांगली जिल्ह्याला 320 कोटी जाहीर केले. म्हणजे घोषित केलेल्या निधीपेक्षा 40 रुपयांचा जास्तीचा निधी आबांच्या जिल्ह्याला देण्यात आला.