Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

 Abdul Sattar | abdul sattar replied sanjay raut over tweet on narhari zhirwal
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वी या निर्णयाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज सकाळी सूचक ट्विट केलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ’ (Narhari Zirwal) असं म्हणत राऊतांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावरुन आता शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी टोला लगावला आहे. नरहरी झिरवळ यांचा आता खेळ संपला आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) आहेत, असं सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

नरहरी झिरवळांचा खेळ आता संपला आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. जर आज विधानसभेचे अध्यक्ष नसते, तर कदाचित 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झिरवळ यांच्याकडे आला असता. त्यावेळी झिरवळ यांनी त्यांचं काम केलं, यापुढे राहुल नार्वेकर त्यांचं काम करतील, असे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

राहुल नार्वेकर यांच्या लंडन दौऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय येणार आहे,
हे राहुल नार्वेकर यांना माहिती आहे. त्यामुळे ते निवांत आहे आणि लंडनला गेले आहेत.
नार्वेकर हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल,
त्यानुसार कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील, असंही सत्तार म्हणाले.

आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.
आजचा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
आजचा निकाल लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे आणि हा निकाल आमच्या बाजूने लागेल,
असा मला विश्वास आहे, असे सत्तार म्हणाले.

Web Title :- Abdul Sattar | abdul sattar replied sanjay raut over tweet on narhari zhirwal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती

Yerwada Jail News | येरवडा कारागृहात गजा मारणे टोळीचा राडा ! दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात घातला पाट

Maharashtra Political Crisis | अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘तोपर्यंत सरकारला धोका…’

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर