मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच (Maharashtra Political Crisis) अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायलय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं असून त्याचदरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मोठं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले, ज्या दिवसांपासून केस दाखल केली, तेव्हापासून चर्चा चालू आहे. ही गोष्ट जूनमध्ये घडली. आज जवळपास मे महिना आहे. बहुतेकजण (Maharashtra Political Crisis) म्हणत होते की मे महिन्यात सुट्ट्या लागतात. त्याआधी याबद्दलचा निकाल लागले. त्यानुसार आता निकाल येत आहे, असे पवार म्हणाले.
पण कदाचित हे प्रकरण…
निकाल काहीही लागला तरी माझं स्वत:चं मत आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च आहे. त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. घटनेनं त्यांना तो दिला आहे. त्यामुळे ते विचार करतीलच. पण कदाचित हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) हे प्रकरण पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला स्वत:ला वाटतं. मी काही मोठ्या वकिलांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आलं की यासंदर्भात बहुतेक विधिमंडळातील ही बाब आहे. त्यामुळे विधानसभा अध्याक्षांकडूनच त्यांनी माहिती घेऊन निकाल द्यावा अशी शक्यता नाकारता येत नाही, असं अजित पवार म्हणाले.
तोपर्यंत सरकारला धोका…
अजित पवार पुढे म्हणाले, आत्याबाईला मिशा असत्या तर काय म्हटलं असतं अशा चर्चांना काय अर्थ आहे?
आजच्या घडीला त्यांच्याकडे 145 पेक्षा जास्त बहुमत आहे. त्यामुळे ते सरकार चालवतायत.
खूप जणांनी अशी वक्तव्य केली आहेत की घटनाबाह्य सरकार वगैरे. जरी म्हणायला तसं असलं तरी त्यांनी
अर्थसंकल्प (Budget) सादर केला आहेत. सरकार ते चावत आहेत. निर्णय ते घेत आहेत.
बहुमताने लोकशाहीत जो अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळाला असतो त्या अधिकारांचा ते पुरेपुर
वापर करत आहेत. 145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं
म्हणण्यात अर्थ नसल्याचे अजित पवार म्हणाले.
Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court verdict ajit pawar reacts
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Narhari Zirwal | 16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस नाही तर…, नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले