Abdul Sattar | वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचे टोचले कान, नेत्यांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्याबाबत गलिच्छ शब्द वापरल्यानंतर (Controversial Statement) राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सुळे यांनी खोक्यावरुन केलेली टीका अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या चांगीलच जीव्हारी लागली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांचा तोल गेला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्याबाहेर निदर्शने केली. तर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करुन त्यांची कानउघडणी केल्याची माहिती मिळत आहे.

 

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वक्तव्यानंतर राज्यात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. यावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना फोन करुन त्यांचे कान टोचले असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. तसेच आपल्या वक्तव्यावर माफी मागण्याचे सत्तारांना शिंदे यांनी आदेश दिले, असं ही सूत्रांनी सांगितलं आहे. वाचाळवीर नेत्यांना कंटाळून शिंदेंनी प्रवक्त्यांची बैठक बोलल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेतील (Balasaheb’s Shiv Sena) प्रवक्ते व महत्त्वाच्या नेत्यांशिवाय इतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधू नये, असे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

 

काय म्हणाले अब्दुल सत्तार?
औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणून तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे.
यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आले. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली.
‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’ असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

 

Web Title :- Abdul Sattar | chief minister eknath shinde is upset with sattar s statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anushka Shetty | अनुष्का शेट्टीने दिले ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम ; म्हणाली ‘प्रभास हा माझा…’

Pune Crime | हडपसर परिसरातील कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जणांवर कारवाई

Abdul Sattar | टीकेनंतर अब्दुल सत्तार आपल्या वक्तव्यावर ठाम, सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना म्हणाले-‘मग त्यांना…’