×
Homeताज्या बातम्याAbdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

Abdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

मुंबई : Abdul Sattar | शिवसेनेतील बंडखोर 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई, धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) कोणाचे इत्यादी मुद्द्यांवरून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर सध्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. एखाद्या गटाला मान्यता नसेल तर त्यावर निवडणूक आयोग (Election Commission) कसा निर्णय घेऊ शकतो असा सवाल ठाकरे गटाचे (Thackeray Group) वकील अभिषेक मनु सिंघवी (Advocate Abhishek Manu Singhvi) यांनी कोर्टात उपस्थित केला. (Abdul Sattar)

या सुनावणी दरम्यान शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना माहिती दिली की, शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची निवड करण्यात आली आहे. 40 आमदार आणि 16 शिवसेना खासदारांच्या उपस्थितीत हा ठराव घेण्यात आला आहे.

दरम्यान, सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Advocate Kapil Sibal) आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी 1971 च्या सादिक अली प्रकरणाचा दाखला दिला. अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद झाल्यानंतर घटनापीठाने 10 मिनिटांचा ब्रेक घेतला.

कपिल सिब्बल म्हणाले, फुटीर गटाने बाजूला होऊन अशापद्धतीने कोणतेही सरकार उलथवता येईल. त्यामुळे सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. 29 जूननंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. सध्या विधानसभा अध्यक्ष त्यांचेच असल्याने ते निर्णय कसा घेतील? चिन्हाबाबत निर्णय गटाला मान्यता देऊ शकत नाही.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाने व्हिप धुडकावत भाजपाला (BJP) मतदान केले.
हा सगळा घटनाक्रम 29 जूननंतरचा आहे. 29 जूनला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अपात्रतेवर स्थगिती दिली होती. तर त्यावर राजकीय पक्षाची व्याखा कुठल्याही घटनेत उल्लेख मिळत नाही.
शिंदे गट विधिमंडळ पक्षाचे सदस्य की राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून कोणत्या भूमिकेतून आयोगाकडे गेले? अशी टीप्पणी कोर्टाने केली. (Abdul Sattar)

शिंदे गटाला कारवाईपासून वाचायचे असेल तर त्यांना इतर पक्षात विलीन व्हावे लागेल.
परंतु कागदोपत्री त्यांनी विलीनकरणाबाबत शिंदे गटाने निर्णय घेतला नाही.
त्यामुळे दहाव्या सूचीनुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी.

दोन तृतीयांश गट फुटला तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व ठेवता येत नाही.
त्यांना इतर पक्षात विलीन व्हावे लागते असा युक्तिवाद वारंवार ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडला. तर बहुमत आमच्या बाजूने आहे.
इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला पाठिंबा मिळत आहे त्यामुळे मूळ पक्ष आमचाच आहे असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला.

Web Title :- Abdul Sattar | minister abdul sattar has informed that cm eknath shinde has been selected as shivsena party chief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nilesh Rane | भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून आता निलेश राणेंचीही टीका, म्हणाले – पवार साहेबांसोबत असणार्‍यांना समजणार नाही…

Maharashtra Political Crisis | ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा! निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नाही; कोर्टाचा निर्णय

Amol Mitkari | ते बंडखोर 16 आमदार अपात्र ठरणार का?, सर्वत्र चर्चा सुरू असताना अमोल मिटकरींचे सूचक ट्विट,…तर शिंदे सरकार दसर्‍यापूर्वीच कोसळेल

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News