Abdul Sattar | माझ्या विरोधात रचलेल्या कटात आपल्याच पक्षातील नेता; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप, शिंदे गटातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बातचीतमधील गोष्टी बाहेर येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्याविरोधात कुटील कट रचण्यात आलेल्या त्या कटात पक्षातीलच नेता आहे, असे सूचक वक्तव्य केले आहे. सत्तारांच्या (Abdul Sattar) या वक्तव्याने शिंदे गटातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येत आहे.

 

विरोधकांविषयी बोलताना सत्तार म्हणाले, मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु या लोकांनी तर राज्याला गिळंकृत केलं असून, यांची चौकशी केली तर पळता भुई थोडी होईल. मुख्यमंत्री यांच्याकडे सर्वांचा डेटा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आहे. या आधीच मी टीईटीतील एका कागदाचा जरी फायदा घेतला असेल, तर मला फाशी द्या. देव माझ्यासोबत आहे त्यामुळे काही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी दर्शविला.

 

तमुच्याविरोधातील कटात कोण सहभागी आहे, असे तुम्हाला वाटते. त्यावर ते म्हणाले, आमच्याच पक्षातील, काही हितचिंतकही असतील अथवा विरोधी पक्षातील ज्या खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत तेदेखील असतील.

मुख्यमंत्र्यांसमवेतची चर्चा अशी बाहेर येत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमची मुख्यमंत्री शिंदेंबरोबरील चर्चा बाहेर आल्याने त्यांना चुकीचे वृत्त बाहेर येत असल्याबद्दल सांगितले. अजून तरी मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे ते त्याचा तपास लावतील.

 

माझे हितचिंतक हे विरोधी पक्षात मोठ्या प्रमाणात आहेत.
अल्पसंख्याक समाजातील माणसाला एवढं महत्त्वाचं मंत्रिपद कसं दिलं, याविषयीची तळमळ त्यांच्या मनात आहे.
परंतु त्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करेन, असंही सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, राष्ट्रवादीत मी गेलो नाही याचा राग त्यांना आहे का.
मी जनतेसाठी लढत, भांडत आहे, कामेही करत आहे.
परंतु काही लोक हे फक्त उद्योगपतींकरिताच कामे करतात, असा आरोपही त्यांनी केला.

 

 

 

Web Title :- Abdul Sattar | shinde faction mla abdul sattar on chief minister
eknath shinde ncp ajit pawar mahavikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा