अभय देओलचा नवीन अवतार, आता चक्क टीनएज मुलीच्या लफड्यात अडकला ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार अभय देओल आपल्या खास अभिनय शैलीसाठी ओळखला जातो. लवकरच तो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करताना दिसणार आहे. द ऑड्स असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. अभय देओलनं याचा टीजर शेअर केला आहे.

सिनेमाचा टीजर सोशल मीडियावर शेअर करताना अभय देओल म्हणतो, “असं अनेकदा दिसतं की, 40 वर्षीय व्यक्ती टीनएज मुलीच्या प्रेमात पडतात. आणि मुलीचं नाव आहे विवेक. आहेना हे ऑड. इतकंच नाही तर हा विवेक जास्तच स्मार्ट आहे.” अभय त्याच्या सिनेमातील अदाकारा यशस्विनी दयामा हिच्याबद्दल बोलत आहेत. आगामी सिनेमात अभय टीनएज मुलीच्या प्रेमात पडलेला दिसणार आहे. सिनेमात अभय एका रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभयच्या या आगामी सिनेमात दोन टीनएज मुलींची स्टोरी आहे ज्यांना 40 वयातील माणसावर प्रेम होतं. मेघा रामास्वामी या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. सिनेमाच्या रिलीजबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

यशस्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर ती ओटीटीवरील मोठी स्टार आहे. तिनं मेड इन हेवन, फोबिया, दिल्ली क्राईम अशा अनेक सीरिजमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिनं शाहरुख खान आणि आलिया भट स्टारर डिअर जिंदगी सिनेमातही काम केलं आहे. यात तिनं आलियाच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.