ऐश्वर्याच्या लग्नाआधी मॉडेलने बंगल्यासमोर केला होता आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील सर्वांत चर्चेतले लग्न 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचे ‘प्रतीक्षा’ निवासस्थानी पार पडले होते. त्यामध्ये एक पाहुणी म्हणजे जान्हवी कपूर आहे. अभिषेक- ऐश्वर्याच्या लग्नाच्या एक दिवस आधीच मॉडेल जान्हवीने घराबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ऐश्वर्यासोबत अभिषेकचे लग्न होत असल्यामुळेच हे पाऊल उचलल्याचा दावा तिने केला होता. काही मित्रांच्या साक्षीने अभिषेकसोबत लग्नगाठ बांधल्याचाही दावा तिने केला होता.

अभिषेकच्या ‘दस’ या सिनेमात जान्हवी एक बॅकग्राऊंड डान्सर होती. तेव्हा हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा तिने केला होता. मात्र, लग्नाचे तिच्याकडे काहीच पुरावे नव्हते. जान्हवीच्या या नाट्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंब हादरले होते. नंतर तिला अटकसुद्धा करण्यात आली होती. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘रावण’, ‘कुछ ना कहो’, ‘गुरू’ यांसारख्या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. या दोघांचा ‘गुरू’ हा चित्रपट हिट ठरला होता.