डोळ्यांवर ब्लॅक गॉगल, डोक्यावर सफेद पगडी; समोर आला अभिषेकचा दमदार लूक

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या आगामी ‘दसवीं ‘ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन सोबत यामी गौतम असुन ती एका पोलिस कर्मचाऱ्यांची भूमिका साकारत आहे, तर अभिषेक बच्चन एका दबंग नेत्याची भूमिका साकारत आहेत. अभ्यासामध्ये अपयशी पण ‘राजकारणाचा सिंह’ या संकल्पनेवर आधारित या चित्रपटात अभिषेकच्या भूमिकेविषयी बरीच चर्चा आहे. आता अभिषेक बच्चनने शूटमधून आणखी एक लूक शेअर केला आहे, जो खूपच जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर आपला लूक शेअर करताना अभिषेकने लिहिले की, ‘ ‘दसवीं’का दसवां दिन”. अभिषेक बच्चनने आपल्या जबरदस्त लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले. अभिषेक आणि यामी गौतम व्यतिरिक्त या चित्रपटात निरमत कौरसुद्धा आहेत.

अभिषेक बच्चनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो एका पालखीवर रॉयल स्टाईलमध्ये बसलेला दिसत आहे. इतकेच नाही तर त्याचे समर्थक त्याला गाजत वाजत घेऊन जाताना दिसत आहेत. पांढरा कुर्ता पायजामा परिधान करुन अभिषेकने पांढरी पगडी घातली आहे. त्याचा गॅगल लुक अप्रतिम दिसत आहे. तो वाढलेल्या दाढीत पाहायला मिळत आहे. त्याचा फोटो पाहून असे वाटते कि, एका दबंग नेत्याच्या भूमिकेत तो एकदम फिट आहे. या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन अशिक्षित , लोभी आणि भ्रष्ट राजकारणीची भूमिका साकारत आहेत,जो नंतर मुख्यमंत्री देखील बनतो. गंगा राम चौधरी असे अभिषेकच्या पात्राचे नाव आहे.

गंगा राम चौधरीला तुरूंगातही जावे लागते, जेथे तो कठोर परिश्रम टाळण्यासाठी दहावीची परीक्षा देण्याची तयारी करतो. या माध्यमातून अभिषेक शिक्षणाचे महत्त्व सांगेल. चित्रपटाचे शूटिंग 22 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती, दिनेश विजान, संदीप लेजेल आणि शोभना यादव यांनी केली आहे. या पॉलिटिकल- ड्रामा चित्रपटामधून तुषार जलोटा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर्सना सध्या बराच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात यामी गौतम ज्योती देसवाल नावाच्या जेलरची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री निमरत कौर अभिषेक बच्चनच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. जिचे नाव बिमला देवी आहे.