‘बॉब बिस्वास’मध्ये अभिषेक बच्चनला ओळखणं मुश्किल ! समोर आले शूटिंगचे फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यानं अलीकडेच ब्रीद (Breathe) आणि लुडो (Ludo) या सिनेमात भूमिका साकारली आहे. यानंतर आता लवकरच तो बॉब बिस्वास (Bob Biswas) सिनेमात दिसणार आहे. यातही तो गंभीर भूमिका करताना दिसणार आहे. कोलकात्यात या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) हीदेखील यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

बॉस बिस्वासच्या सेटवरून अभिषेकचे काही फोटो समोर आले आहेत, जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. खास बात अशी की, या फोटोत अभिषेक बच्चन ओळखूही येत नाही. यात अभिषेकचा नवीन आणि खूपच वेगळा असा लुक दिसत आहे. अभिषेकचा हा लुक समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

बॉब बिस्वास सिनेमाबद्दल बोलयाचं झालं तर गौरी खान (Gauri Khan), सुजॉय घोष (Sujoy Ghosh) आणि गौरव वर्मा (Gaurav Varma) यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. अन्नपूर्णा घोष (Annapurna Ghosh) यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे.

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो द बिग बुल आणि बॉब बिस्वास अशा काही सिनेमातही तो कम करताना दिसणार आहे. यापैकी बॉब बिस्वास या सिनेमाची शूटिंग त्यानं सुरू केली होती. परंतु लॉकडाउनमुळं सारं काही ठप्प झालं होतं. नुकताच तो ब्रीद या वेब सीरिज आणि लुडो या सिनेमात काम करताना दिसला आहे.

You might also like