अभाविपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न, ५४ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुण्यात होणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेची बैठक चेन्नई येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये विविध निर्णय तसेच वर्ष २०१९-२०२० ची अभाविपची आगामी दिशा ठरवण्यात आली.

या बैठकीला संबोधित करताना अभाविप राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.एस. सुब्बैय्या यांनी “विद्यार्थी कार्यकर्त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून, तसेच कामाचे स्वरूप व संघटनात्मक काम प्रयत्नपूर्वक वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.

“यावेळी संघटनात्मक कामाचे अवलोकन करताना अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री श्री.सुनील आंबेकरांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अभाविपच्या कामामध्ये आणण्यासाठी, तसेच देशभरात वाढणाऱ्या गुणात्मक कामाचे वृद्धीवर विचार करत असताना विशेष कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच आगामी दिशा मांडतांना राष्ट्रीय महामंत्री श्री.आशिष चौहान यांनी, पश्चिम बंगालमधील तुष्टीकरणाचे राजकारण, पर्यावरण, संशोधन, जनजाती क्षेत्र, भारतीय भाषा, शिक्षणाचे व्यापारीकरण व शिक्षणाचे भारतीयीकरण आणि शहरी माओवाद या विषयांवर प्रकाश टाकताना यामध्ये विशेष काम करण्याची आजची गरज स्पष्ट केली.

अभाविपचे ५४ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुणे येथे होणार –

त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठक व महाराष्ट्र प्रदेश अभ्यासवर्ग दि.६ जून ते १० जून या दरम्यान नाशिक येथे संपन्न झाला. याप्रसंगी ठरवण्यात आले की, ९ जुलै रोजी विद्यार्थी दिनानिमित्त अभाविप १००० महाविद्यालये व १ लक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार आहे.

यावर्षी अभाविपचे ५४ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुणे येथे होणार आहे. दरवर्षी आयोजित केले जाणारे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन “प्रतिभा संगम” हे यावर्षी विभाग आणि राज्य अशा दोन्ही स्तरावर करण्यात येऊन जास्तीत जास्त नवसाहित्यिक विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे.

येणाऱ्या काळात अभाविपची या संदर्भात होणार आंदोलने –

आगामी काळात अभाविप स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय (Autonomous Engineering Colleges) आणि खाजगी विद्यापीठाच्या वाढते शुल्क व मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करणार आहे. आणि अवाजवी शुल्काचे गांभीर्य लक्षात घेता विद्यापीठाच्या शुल्क निर्धारण समितीच्या विरोधात ही आंदोलन करण्यात येणार आहे.

आयटीआय व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी आगामी काळात आंदोलन करण्यात येणार आहे. अभ्यास मंडळ (BOS) विद्यार्थी नामांकनाचा वाढता घोळ लक्षात घेता त्याविरोधात ही अभाविप येणाऱ्या काळात आंदोलन करणार आहे.

याप्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे आणि अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे हे उपस्थित होते.

सिने जगत –

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

Loading...
You might also like