ACB Demand Case On Traffic Police | 14 हजाराच्या लाच प्रकरणी 2 वाहतूक पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Demand Case On Traffic Police | बोलेरो पिकअप टेम्पो सोडविण्याकरिता 14 हजार रूपयांच्या लाचेची मागणी (Bribe Case) करून तडजोडीअंती 3 हजार रूपयांची मागणी केल्याप्रकरणी भिवंडी शहर (Bhiwandi City Traffic Police) आणि शिळफाटा वाहतूक शाखेतील (ShilPhata Traffic Police) प्रत्येकी एक असे एकुण 2 पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याविरूध्द डायघर पोलिस ठाण्यात (Shil Daighar Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Demand Case On Traffic Police)

 

दिलीप मालु सातपुते Dilip Malu Satpute (पो.हवा. बक्कल नं. 2984, नेमणुक – भिवंडी शहर वाहतुक शाखा, ठाणे शहर – Thane City Police) आणि सचिन मधुकर भोसले Sachin Madhukar Bhosale (पो. हवा. बक्कल नं. 3564, नेमणुक – शिळफाटा वाहतुक शाखा, ठाणे शहर) अशी गुन्हा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप टेम्पो हा शिळफाटा वाहतूक चौकी येथे थांबविला होता. सदरील टेम्पा सोडवण्याकरिता पोलिस हवालदार दिलीप सातपुते आणि त्यांच्या सह कर्मचार्‍यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. 6 मार्च 2023 रोजी नवी मुंबईच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या (Navi Mumbai ACB Trap) कार्यालयात तक्रार दिली होती. (ACB Demand Case On Traffic Police)

दि. 6 मार्च 2023 रोजी सरकारी पंचासमक्ष केलेल्या लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी कारवाई दरम्यान
पोलिस हवालदार दिलीप सातपुते, सचिन भोसले आणि इतर दोन अनोळखी वाहतुक पोलिस अंमलदार
यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा व पदाचा दुरूपयोग करून तक्रारदार यांच्याकडे 14 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती 3 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (Thane ACB SP Sunil Lokhande) आणि
अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर (Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title :  ACB Demand Case On Traffic Police | 2 traffic police on ‘radar’ of anti-corruption in bribery case of 14 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा