ACB Trap Case News | 20 हजाराची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | 20 हजाराच्या लाचेची मागणी करून लाच घेताना तलाठयास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Nashik ACB Trap) रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Mumbainaka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. (ACB Trap Case News)

 

सचिन काशिनाथ म्हस्के Sachin Kashinath Mhaske (पद – तलाठी, सजा सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व त्यांचे 3 भागीदार यांनी मिळुन इगतपुरी तालुक्यातील मौजे मुरंबी येथे शेतजमिन खरेदी केलेली आहे (Nashik Bribe Case News). सदर जमिनीच्या खरेदीखताच्या आधारे फेरफार नोंद करून तक्रारदार व इतर खरेदीदार यांचा नावे अधिकारी अभिलेखात दाखल करण्याच्या मोबदल्यात तलाठी सचिन काशिनाथ म्हस्के यांनी तक्रादाराकडे 20 हजाराच्या लाचेची मागणी केली. (ACB Trap Case News)

 

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नाशिकच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 1 जुलै रोजी गोविंदनगर ते इंदिरानगरकडे जाणार्‍या रस्त्यावरील असलेल्या शितल अव्हेन्यु अपार्टमेंटमध्ये असलेल्या संगम टी स्टॉल समोर तलाठी म्हस्के यांनी लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (Nashik Crime News)

 

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
(Nashik ACB SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदिप घुगे (PI Sandeep Ghuge)
अधिक तपास करीत आहेत. (Igatpuri ACB Trap News)

 

Web Title : ACB Trap Case News | Nashik ACB Arrest Talathi Sachin Kashinath Mhaske In Igatpuri Bribe Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा