Pune Politics – PMC Elections | अजित पवार यांच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे BJP ची महापालिकेतील एकहाती सत्ता जाणार?

 मनपा निवडणुकीच्या जागा वाटपात सर्वाधिक फटका भाजपच्या नगरसेवक आणि इच्छुकांना बसण्याची चिन्हे

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Politics – PMC Elections | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) सवता सुभा करत राज्याच्या मंत्रीमंडळात सहभाग घेतल्याने शहरातील राजकिय गणिते बदलणार आहेत. प्रामुख्याने लोकसभेपेक्षाही (Pune Lok Sabha Elections) आगामी विधानसभा (Pune Vidhan Sabha Elections) आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या (Pune PMC Elections) जागा वाटपात याचा सर्वाधीक फटका भाजपचे नगरसेवक (BJP Corporators) आणि इच्छुकांना बसण्याची चिन्हे आहेत. यासोबतच 2017 मध्ये मिळविलेल्या एकहाती सत्तेवरही शहर भाजपला पाणी सोडावे लागणार, असे चित्र निर्माण झाले आहे. (Pune Politics – PMC Elections)

 

भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये बाजी मारली. तर 2017 च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 98 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. परंतू यानंतर अवघ्या दोनच वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र आठ पैकी दोन मतदार संघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. तर नुकतेच झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll Election) कॉंग्रेसने (Congress) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) माध्यमातून 9 वर्षांनी पुनरागमन केले. कसब्याचा निकाल एका अर्थाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपसाठी धोक्याची घंटाच ठरणारा आहे. (Pune Politics – PMC Elections)

 

दरम्यान, कालच्या घटनाक्रमामुळे शहरातील भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील मंडळी एकत्र आले आहेत. तर वर्षभरापुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) भाजपसोबत आली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आगामी सर्व निवडणुका भाजपसोबत लढण्याची घोषणा युती करतानाच केली आहे. यासोबतच भाजपचा जुना मित्र पक्ष रिपाइं (आठवले गट) हा थोड्या का असेना जागा वाटपात भागीदार आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला, अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिंदे यांची शिवसेना आणि रिपाइंला जागा सोडाव्या लागणार आहेत.

पुणे महापालिकेत 164 जागांपैकी 98 भाजपकडे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 42 जागा होत्या.
तर कॉंग्रेस आणि शिवसेनेकडे प्रत्येकी दहा जागा होत्या. तर मनसे 2 व एमआयएमकडे एक जागा होती.
भाजपने 2017 मध्ये रिपाइंला 9 ते 10 जागा सोडल्या होत्या व उर्वरीत जागांवर पक्षाचे उमेदवार दिले होते.
परंतू सर्वच उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते. परंतू आगामी निवडणुकीत अजित पवार,
एकनाथ शिंदे आणि रिपाइं यांच्या पक्षासोबत निवडणुकीला सामोरे जायचे झाल्यास भाजपला जवळपास निम्म्यांहून अधिक जागांवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लढण्यापुर्वीच भाजपला विद्यमान नगरसेवकांच्या जागा सोडाव्या लागणार आहेत. साधारण निम्म्या म्हंटल्या तरी या जागा 82 च्या आसपास असतील.

यानंतरही तीन्ही पक्षांची सत्ता आल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तीन ते चार टर्म नगरसेवक राहीलेले
अजित पवार समर्थक विविध पदांवर काम केलेले ज्येष्ठ नगरसेवक पदांवर दावा सांगण्याची शक्यता आहे.
चारही पक्षांच्या महायुतीमुळे शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच रिपाइंचे नगरसेवक निवडूण आणणे आणि त्यांनाही विविध पदांवर संधी देण्याची जबाबदारी भाजप आणि अजित पवार यांच्यावर राहील, असे दिसते. यामुळे नुकत्याच सुरू असलेल्या घडामोडींवरून शहरात भाजपची पिछेहाटच होणार असून 2017 मध्ये मिळविलेल्या एकहाती सत्तेवर पाणी सोडावे लागणार असल्याचे दिसून येते.

 

Web Title : Pune Politics – PMC Elections | Ajit Pawar’s entry in the Mahayuti will BJP single-handedly rule in the
Municipal Corporation?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा