ACB Trap Case News | लाच घेताना उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | लघु पाटबंधारे विभागाच्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत केलेल्या कामाचे बील काढून दिल्याच्या मोबदल्यात 19 हजार 500 रुपयांची लाच घेताना पंचायत समिती शहादा येथील कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय जलसंधारण अधिकारी याला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.25) नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ केली. (ACB Trap Case News)

कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय जलसंधारण अधिकारी दिनेश केशवराव पाटील (वय-51) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत शहादा येथील 22 वर्षाच्या व्यक्तीने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार तक्रार केली आहे. (ACB Trap Case News)

तक्रारदार यांनी ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत,
शहादा तालुक्यात तीन कामे पूर्ण केली आहेत. तिन्ही कामांची रक्कम/बील काढून दिल्याच्या मोबदल्यात, दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 95 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी वेळोवेळी 75 हजार दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून या आधीच घेतली आहे. उर्वरित 20 हजार रुपयांसाठी पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.

नंदुरबार एसीबीच्या पथकाने 20 सप्टेंबर रोजी पंचासमक्ष पडताळी केली असता दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे
20 रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 19 हजार 500 रुपये स्वीकारण्याचे पंचासमक्ष कबूल केले.
त्यानुसार सोमवारी नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सापळा रचण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दिनेश पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,
वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार एसीबीचे पोलीस उप अधीक्षक राकेश आ. चौधरी,
पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस अंमलदार विलास पाटील, ज्योती पाटील, अमोल मराठे, देवराम गावित,
संदीप नावाडेकर, मनोज अहिरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | 35 हजार रुपये लाच घेताना जिल्हा जात पडताळणी समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Auction Sealed Properties PMC Property Tax Due | मिळकतकर थकल्याने सील केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव; महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती