ACB Trap Case | 35 हजार रुपये लाच घेताना जिल्हा जात पडताळणी समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | जात प्रमाणपत्र देण्यासाठी 35 हजार रुपये लाच स्वीकारताना जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, जालना येथील कंत्राटी संशोधक सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. राहुल शंकर बनसोडे Rahul Shankar Bansode (वय- 43 रा. पंचशीलनगर, मोंढा नाका, औरंगाबाद) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे (Jalna Bribe Case). एसीबीने ही कारवाई सोमवारी (दि.25) केली. (ACB Trap Case)

याबाबत 57 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या मुलांनी तेली जातीचे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यायासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, जालना येथे अर्ज केला होता. या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देऊन बनसोडे याने 22 सप्टेंबर रोजी 40 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 35 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना एसीबीकडे तक्रार केली. (ACB Trap Case)

एसीबीच्या पथकाने 22 सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता बनसोडे याने 40 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन 35 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आहे. त्यावरून सोमवारी सापळा कारवाई करण्यात आली. आरोपी बनसोडे याला तक्रारदार यांच्या मुलांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पंचासमक्ष 35 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. राहुल बनसोडे यांच्या विरोधात कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस अंमलदार घायवट, गणेश बुजडे, गणेश चेके, शिवलिंग खुळे, चालक बिरोनकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

Ajit Pawar On Eknath Khadse | ‘…तर मी डायरेक्ट विचारेन, मला मध्यस्थी लागत नाही’, एकनाथ खडसेंच्या विधानावर अजित पवारांचे सडेतोड उत्तर

Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या’ बावनकुळेंच्या विधानाची क्लिप व्हायरल, विरोधकांनी उठवली टीकेची झोड

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या ऐवजी
बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे; प्रकल्प राबविल्यास मुठा उजव्या
कालव्यावर २७ कि.मी. पर्यायी रस्ता तयार होणार !