ACB Trap Case | पान टपरी चालकाकडून लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | गुटखा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई न करण्यासाठी एका पानटपरी दुकानदाराकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी 12 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारताना धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टबल व खासगी पंटरला धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. (Dhule Bribe Case)

पोलीस कॉन्स्टेबल अझरुदिन झहिरुदिन शेख Police Constable Azrudin Zahirudin Shaikh (वय-42), खासगी पंटर बासित रशीद अन्सारी Basit Rashid Ansari (वय – 24) असे लाच घेताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 48 वर्षीय व्यक्तीने धुळे एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे.

तक्रारदार यांचा पान दुकानाचा व्यवसाय आहे. व्यवसाय चालवायचा असेल तर पानमसाला गुटखा कारवाई न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी 30 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता लाचेच्या रकमेपैकी 12 हजार रुपयांचा हफ्ता शेख यांनी खाजगी पंटर मार्फत स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शेख व खाजगी पंटर या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध आझाद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap Case)

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील,
पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे,
मकरंद पाटील, प्रविण पाटील यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा, आढळरावांनाही दिले आव्हान, ”स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा…”

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी

Murlidhar Mohol Kasba Rally | ‘मोदीजींचंच नेतृत्व देशाला भारी’ मुरलीधर मोहोळ यांच्या कसब्यातील प्रचारात घुमली आरोळी