ACB Trap Case | पुणे : 4 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी कॉग्निझंट व लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या पर्यावरण विषयक परवानगी मिळवण्यासाठी 7 लाख 70 हजार अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनातील अंदाजे 4 कोटी 50 लाख रुपये) लाच दिली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.8) बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2012 ते सन 2014 मध्ये पुण्यात घडला होता. (Pune Bribe Case)

याबाबत तक्रारदार यांनी सत्र न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे एसीबीने (Pune ACB) बहुराष्ट्रीय कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे तत्कालीन अधिकारी, तत्कालीन उप संचालक श्रीमनिकंद राममुर्ती, लार्सन अँड टुब्रो चे तत्कालीन अधिकारी, विविध शासकीय विभागाचे तत्कालीन अधिकारी व इतर अनोळखी खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन कार्पोरेशन अमेरिका या कंपनीची उपकंपनी आहे. कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने मद्रास, तामीळनाडू, पुणे, महाराष्ट्रासह भारात अनेक ठिकाणी प्रोजेक्ट सुरु केले आहेत. यासाठी 2012 मध्ये या कंपनीने पुण्यात हिंजवडी या ठिकाणी व्यावसायिक इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. कॉग्निझंट इंडियाचे, हिंजवडी येथील प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकामाची जबाबदारी कॉग्निझंट कंपनीचे श्रीमनिकंदन राममुर्ती यांच्यावर होती. (ACB Trap Case)

राममुर्ती व एल अॅन्ड टी या कंपनीने कॉग्निझंट इंडिया टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रा. लि. पुणे या हिंजवडी येथील इमारतीचे बांधकामाच्या संदर्भात पर्यावरणीय मंजुरी मिळवण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांशी संगनमत केले. त्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन परवानगी मिळवल्या. यासाठी राममुर्ती यांनी 7 लाख 70 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम लाच म्हणून अनोळखी अधिकाऱ्यांना दिली.

याबाबत तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली.
मात्र, एसीबीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाला प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्याने विशेष न्यायालय तथा सत्र न्यायाधीश
यांनी फौजदारी कलम 156 नुसार गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश पुणे एसीबी कार्यालयाला दिले होते.
त्यानुसार पुणे एसीबीने बुधवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिल्याने पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा, आढळरावांनाही दिले आव्हान, ”स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा…”

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी

Murlidhar Mohol Kasba Rally | ‘मोदीजींचंच नेतृत्व देशाला भारी’ मुरलीधर मोहोळ यांच्या कसब्यातील प्रचारात घुमली आरोळी