ACB Trap Case | 50 हजार रुपये लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | जिल्हाधिकारी यांना जमीन हस्तांतरित करण्याचा अहवाल सकारात्मक पाठवण्यासाठी 70 हजार रुपये लाचेची मागणी करुन 50 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सुधीर पांडुरंग बॉम्बे Sudhir Pandurang Bombay (वय-54) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.4) केली. (ACB Trap Case)

याबाबत 45 वर्षाच्या व्यक्तीने नवी मुंबई एसीबीकडे (Mumbai ACB Trap) 8 सप्टेंबर रोजी तक्रार केली होती. तक्रारदार यांना मुरबाड तालुक्यातील मालेगाव येथील गट नं.129 मधील 0.53.10 आर क्षेत्रफळाची जमिनीची विक्री करायची होती. जमिनीच्या विक्री व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात जमीन मालकाकडून अधिकार पत्र मिळवले आहे. ही जमिन खरेदी आणि विक्री करणारे दोघेही आदिवासी आहेत. त्यामुळे जमीन हस्तांतरीत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक होती. (ACB Trap Case)

जमीन हस्तांतरित करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी मंडळ अधिकारी सुधीर बॉम्बे याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता अहवाल सकारात्मक पाठवण्यासाठी सुधीर बॉम्बे यांनी 70 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार बुधवारी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्यान आरोपी सुधीर बॉम्बे याने तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या संभाषणादरम्यान सुधीर याने 60 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपये लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी सुधीर बॉम्बे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कामगिरी ठाणे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई एसीबी पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे,
पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार पवार, ताम्हणेकर, अहिरे, विश्वासराव, सावंत,
चव्हाण, माने, चालक गायकवाड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Political News | दहा वर्षात तयार झालेला पुण्याचा ‘बालेकिल्ला’ लोकसभेच्या तहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वाधीन

Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule | बच्चू कडूंचा बावनकुळेंना निर्वाणीचा इशारा,
म्हणाले – ‘अजून 10 खासदार पाठवले तरी…’

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडे लाच मागणाऱ्या पुणे महावितरणच्या कार्यकारी अभियंता
(क्लास वन) यांच्यावर एसीबीकडून FIR