Pune Political News | दहा वर्षात तयार झालेला पुण्याचा ‘बालेकिल्ला’ लोकसभेच्या तहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वाधीन

भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच मतदारही निराशेच्या गर्तेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Political News | भाजपचे वरिष्ठ नेते (Senior BJP Leader) व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडील पालकमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (Senior NCP Leader) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सोपविल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. एकेकाळी पुण्यात कॉंग्रेसचे वर्चस्व असताना आघाडी असतानाही याच अजित पवार यांनी कॉंग्रेसची धुळधाण केली होती. सत्ताकांक्षी असलेले पवार पुन्हा एकदा पक्षवाढीसाठी मागील दहा वर्षात तयार झालेल्या भाजपच्या ‘बालेकिल्ल्याला’ हादरे देउ शकतात, अशी शंका भाजपचे दुसर्‍या फळीतील शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. (Pune Political News)

विधानसभेच्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सातत्याने घडत असलेल्या घडामोडींची मालिका अद्यापही सुरूच आहे. मागीलवर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर स्थापन झालेल्या भाजप- शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) सरकारमध्ये तीन महिन्यांपुर्वी सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अजित पवार यांच्याकडे पुन्हा पुण्याचे पालकमंत्रीपद आले आहे. २०१४ ला सुरू झालेल्या मोदी (PM Narendra Modi) पर्वापासून लोकसभा (Lok Sabha Elections), विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha Elections) आणि महापालिका निवडणुकांमध्ये अभूतपुर्व यश मिळविणार्‍या भाजपला मात्र नव्या समीकरणात ‘त्याग’ करावा लागला आहे. भाजपचे नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्रीपद सोडावे लागले आहे. (Pune Political News)

पुण्याचे म्हणून ओळखले जाणारे दिवंगत खासदार गिरीष बापट (Late MP Girish Bapat) यांनी गेल्या काही वर्षात पुण्याच्या सर्वच भागामध्ये भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न केले. पुण्याचे भाजपचे प्रमुख नेते म्हणून बापट यांच्याकडे पाहीले जात होते. दरम्यान २०१९ मध्ये भाजपने त्यांना लोकसभेत पाठविले. तर भाजपचे प्रदेशअध्यक्ष कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा (Kothrud Vidhan Sabha) निवडणुकीत निवडूण आणले. दुर्देवाने २०१९ मध्ये निवडणुक निकालानंतर भाजप- शिवसेना युती बिनसली आणि शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे आले. मात्र, मागीलवर्षी जुनमध्ये शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) कोसळले. वर्षभर विरोधात राहीलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तीन महिन्यांपुर्वी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट सत्तेत सहभागी झाला व पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली.

काही काळांपासून आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांची प्रकृती अगदीच खालवली असताना आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे मार्चमध्ये कसबा विधानसभेची पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात महाविकास आघाडीकडून भाजपचा पराभव झाला. यानंतर काहीच दिवसांनी खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आणि भाजपचा शहरातील नेतृत्वाचा चेहेरा गमावला. यानंतर तीन महिन्यांनी अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्या अगोदरपासूनच भाजपने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही काही अलिखित बंधने आणल्याने पुण्याचे पालकमंत्रीपद पवार यांच्याकडे जाणार, अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत आल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे यांच्यासोबतच पवार यांनाही राजकिय वाटा द्यावा लागणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली. तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदारही नाराज झाला. आज त्यापुढे जाउन पवार यांना पालकमंत्री पद अथवा जिल्ह्याची प्रशासकिय सूत्रे सोपविली आहेत, यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजकिय भवितव्य टांगणीला लागले आहे.

भाजप आमदार अन् नगरसेवक पदासाठीच्या इच्छुकांकडून चिंता व्यक्त

अजित पवार हे आक्रमक आणि प्रशासनावर पकड असलेले नेतृत्व आहे.
येत्या काळात जी काही विकासकामे होतील, त्याचे श्रेय आपसुखच पवार यांना जाणार.
एरव्ही पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून सहजगत्या होणार्‍या कामांना खीळ बसणार आणि पवार यांच्या कार्यालयाचे खेटे घालावे लागणार का? अशा शंकांनी भाजप कार्यकर्त्यांना घेरायला सुरूवात केली आहे.
यापुढे जाउन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याने अजित पवार हे त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांना बळ देउन आगामी निवडणुकांसाठी मजबूत करण्यावर भर देतील, हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून स्पष्ट होत आहे. अशावेळी आम्ही काय करायचे? याची चिंता भाजपचे आमदार, नगरसेवक पदासाठीचे इच्छुक व्यक्त करू लागले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule | बच्चू कडूंचा बावनकुळेंना निर्वाणीचा इशारा,
म्हणाले – ‘अजून 10 खासदार पाठवले तरी…’