Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule | बच्चू कडूंचा बावनकुळेंना निर्वाणीचा इशारा, म्हणाले – ‘अजून 10 खासदार पाठवले तरी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule | भाजपाकडून मला त्रास दिला जातोय. एकीकडे सांगायचं आपण सत्तेत यायचं. दुसरीकडे हेच लोक मित्रत्व पाळत नसतील, तर चुकीचं आहे. अशा पद्धतीने त्रास दिला जातोय की…काहीही करून बच्चू कडू मतदारसंघात पडला पाहिजे…बावनकुळेंनी खासदार बोंडेंना सांगितलं तरी…मी बावनकुळेंना सांगतो, आम्हाला पाडायला असे १० खासदार अजून पाठवा, तरी बच्चू कडू पडणार नाही, असे आव्हान प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना दिले आहे. (Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule)

दोनच दिवसापूर्वी अकोल्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी भाजपाकडून मला खूप त्रास होतोय, असे म्हटले होते. आज त्यांनी पुन्हा तसेच वक्तव्य करत थेट भाजपा प्रदेशाध्यक्षांना आव्हान दिले आहे. (Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule)

अकोल्यात कडू यांनी म्हटले होते की, मला भाजपाचा खूप त्रास आहे. आम्हाला काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपाचा होतोय.

परंतु, आम्ही भाजपाला जुमानत नाही. दोन खासदार, तीन आमदार आणि अजून ताकद लावा. परंतु, माझं म्हणणं आहे की मैत्री करताना, मित्रत्व निभावताना सगळ्याच अनुषंगाने निभावले पाहिजे. मैत्री न निभावता केवळ कामापुरते वापरायचे आणि नंतर दुर्लक्ष करायचे, हे चुकीचे आहे.

भाजपाने फक्त सत्तेपुरता विचार न करता, सत्तेपलीकडे काही गोष्टी असतात, त्या स्वीकारायला हव्यात.
तसेच माझ्यासोबत असलेल्या लोकांसाठी फिल्डिंग लावण्याचे उद्योग भाजपाने बंद केले पाहिजेत, असा आरोप कडू यांनी केला होता.

दरम्यान, कडू यांच्या वक्तव्यावरून त्यांचे महायुतीसोबतचे संबंध बिघडले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मंत्रिपदाचे आश्वासन देऊनही कडू यांना भाजपाने मंत्री बनवले नाही.
आता त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खुद्द कडू यांनी केला आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत आहेत.
त्यामुळे महायुतीमध्ये सर्व आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis & Ajit Pawar | आधी मुख्यमंत्र्यांची हिंमत नव्हती,
आता अजितदादांच्या निर्णयाला उपमुख्यमंत्री फडणवीस स्थगिती देतात – भास्कर जाधव