ACB Trap News | मुरुमाचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी १० लाखांची मागणी, पाच लाख लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी जाळ्यात

ACB Trap News | A demand of 10 lakhs to release Muruma's tractor, the forest area officer caught in the trap of accepting a bribe of five lakhs

गडचिरोली : ACB Trap News | रस्त्याच्या कामासाठी बेकायदेशीरपणे उत्खनन करुन वापरलेल्या मुरुमाचा ट्रॅक्टर सोडण्यासाठी १० लाख रुपयांची लाच (Accepting Bribe) मागून ५ लाख रुपये घेताना वनपरिक्षेत्र अधिकार्‍याला (Forest Range Officer) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. (ACB Trap News)

प्रमोद आनंदराव जेनेकर Pramod Anandrao Janekar (वय ३८) असे या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचे नाव आहे. तो अहेरीच्या पेरमिली वनपरिक्षेत्रात कार्यरत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. वन विभागातून तस्करी तसेच खनिज संपत्तीची वन विभागाच्या संगनमताने राजरोस लुट केली जात असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Gadchiroli) कारवाईने ही बाब ठळकपणे समोर आली आहे. अहेरी तालुक्यातील दुर्गम पेरमिली येथील शासकीय निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

तुमरगुंडा कायमपल्ली रस्त्याच्या कामासाठी बेकायदेशीरपणे मुरुमाचा वापर केला जात असल्याची माहिती वन विभागाला
मिळाली होती. वन विभागाने कारवाई करुन ट्रॅक्टर पकडला़ मुरुमाचा साठा जप्त केला़ ट्रॅक्टरच्या मालकाला ७२ लाखांचा दंड करण्यात आला़ ही दंडाची रक्कम ७२ लाखांहून ५ लाख रुपयांपर्यंत कमी करुन ट्रॅक्टर सोडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर याने १० लाख रुपयांची मागणी केली होती. (ACB Trap News)

याबाबत ट्रॅक्टरमालकाने गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ४ जानेवारी रोजी त्याची पडताळणी केली.
त्यात तडजोडीअंती जेनेकर याने ५ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
त्यानंतर तातडीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अनामिका मिझापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, हवालदार नरेश कस्तुरवार,
पोलिस अंमलदार किशोर जौंजारकर, संदीप घोरमोडे, संदीप उडापा हे पथक पेरमिली येथे दाखल झाले. त्यांनी सापळा रचला.
शासकीय निवासस्थानी ट्रॅक्टरमालकाकडून ५ लाख रुपये घेत असताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेनेकर
याला पकडण्यात आले. याबाबत पेरमिली पोलीस ठाण्यात (Permili Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे: दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रॉडने मारहाण, तिघांना अटक

तरुणीला मारहाण करुन अश्लील शिवीगाळ, विनयभंग केल्याप्रकरणी एकावर FIR; हडपसर परिसरातील घटना

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण उठविण्यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष

पैसे चोरल्याच्या संशयावरून कामगाराचा खून, एकाला अटक; वडगाव मधील घटना

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)