Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे: दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रॉडने मारहाण, तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दुध डेअरी (Milk Dairy) मध्ये घसून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीत घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.3) रात्री पावणे दहाच्या सुमारास हांडेवाडी येथील गुरुदत्त दुध डेअरीमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अविष्कार संतोष झांबरे (वय-19 रा. झांबरे वस्ती, होळकरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन युवराज देवकाते (वय-21 रा. होळकरवाडी), आकाश चाबुकस्वार (वय-20 रा. हांडेवाडी), आदित्य अशोक कवडे (वय-22 रा. हांडेवाडी) यांच्यावर आयपीसी 327, 452, 323, 427, 504, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविष्कार झांबरे यांची हांडेवाडी येथे गुरुदत्त दुध डेअरी आहे.
बुधवारी रात्री फिर्यादी डेअरीमध्ये काम करत असताना आरोपी डेअरीमध्ये आले.
त्यांनी झांबरे याच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, फिर्यादी यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करुन दमदाटी केली.

तसेच हातातील लोखंडी रॉडने मारहाण करुन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
आरोपींनी फिर्यादी यांच्या दुध डेअरीच्या गल्ल्यातील दोन ते तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत दुचाकीवरुन
पळून गेले. याबाबत झांबरे याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार (API Kishore Pawar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar | ‘गृहमंत्र्यांनी या महाशयांवर कठोर कारवाई करावी’, रुपाली चाकणकरांचा आव्हाडांवर संताप

NCP Chief Sharad Pawar | ”मोदी सांगतात गॅरंटी, पण ती काही खरी नाही…”, शरद पवारांची खोचक टिका

Pune PMC News | पुणे महापालिकेने नोटीसेस दिलेल्या अनधिकृत बांधकामांचे व्यवहार करु नयेत; असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस् संघटनेचे सदस्यांना आदेश