ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 50 हजाराची लाच घेणारा सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

रायगड : पोलीसनामा ऑलनाइन – ACB Trap News | गांडूळ खत (Gandul Khat) बनविण्यासाठीच्या शेडचे असेसमेंट लावण्याकरिता 75 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Raigad Bribe Case) करून तडजोडीअंती 50 हजार रूपयाची लाच घेणार्‍या गु्रप ग्रामपंचायत उरसोलीच्या सरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Maharashtra) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. (ACB Trap News)

मनिष महादेव नांदगावकर Manish Mahadev Nandgaonkar (42, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत उरसोली, ता. मुरूड, जि. रायगड) असे लाच घेणार्‍या सरपंचाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे मौजे आदाड, गट नं. 502 मध्ये गांडुळ खत बनविण्यासाठीचे शेडचे असेसमेंट लावण्याकरिता सरपंच मनिष महादेव नांदगावकर यांनी सुरूवातीला 75 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती (Raigad ACB Trap). तडजोडीअंती 50 हजार रूपये लाच घेण्याचे ठरले. (ACB Trap News)

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली.
सापळा रचला असता सरपंच मनिष नांदगावकर यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 50 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (Raigad Crime News)

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande), अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर
(Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक शशीकांत पाडावे
(DySP Shashikant Padave) , पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे (Police Inspector Ranjeet Galande) ,
पोलिस हवालदार अरूण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, पोलिस नाईक विवेक खंडागळे आणि जितेंद्र पाटील
यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे करीत आहेत.

Web Title :- ACB Trap News | Anti-corruption department Raigad: Sarpanch who took bribe of 50 thousand in anti-corruption net

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : मिळकतकराची बिले 1 मे पासून नव्हे तर ‘या’ तारखेपासून मिळणार, 15 जुलैपर्यंतच मिळणार सवलत

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : बीपी (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह) साठीची 6 प्रकारची औषधे मिळणार मोफत

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Roll Ball World Cup Tournament In Pune | सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद