ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : राज्य उत्पादन शुल्कचा अधिकारी 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | परमीट रूम (Permit Room) हॉटेलचे नूतनीकरण करून दिल्याचा मोबदला म्हणून 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Chhatrapati Sambhaji Nagar Bribe Demand) करून 15 हजार रूपयाची लाच घेणार्‍या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. (ACB Trap News)

संजय महादेव पवार Sanjay Mahadev Pawar (46, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, ता. भोकरदन, जि. जालना – Jalna. रा. जे.पी. नगर, भोकरदन) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्याचे नाव आहे (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील माहोरा येथे परमीट रूम हॉटेल आहे. त्याचे नूतनीकरण करून दिल्याचा मोबदला म्हणून दुय्यम निरीक्षक संजय महादेव पवार यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रूपये घेण्याचे मान्य केले. (ACB Trap News)

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सापळा लावण्यात आल्यानंतर दुय्यम निरीक्षक संजय पवार यांनी 15 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे SP Sandip Atole), अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe), पोलिस उप अधीक्षक मारूती पंडित (DySP Maruti Pandit) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हनुमंत वारे (PI Hanumant Ware), पोलिस नाईक साईनाथ तोडकर, राजेंद्र सीनकर आणि चालक पोलिस अंमलदार चांगदेव बागुल यांनी केली आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar ACB Trap)

 

Web Title :- ACB Trap News | Anti-corruption Department: State Excise Officer caught in anti-corruption net while accepting bribe of 15,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी पुन्हा एकदा रोखला बालविवाह ! 8 मार्चपासून आजपर्यंत जिल्ह्यातील 602 ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह विरोधी ठराव, एसपी पी.आर. पाटील यांचा पुढाकार

Pune Vidyarthi Griha | पुणे विद्यार्थी गृहाचा मुद्रणातील भरीव कामगिरीबद्दल नवी दिल्लीतील ‘टेकफोरडी’ शैक्षणिक प्रदर्शनात सन्मान

Sharad Pawar Resigns | शरद पवार निवृत्ती मागे घेणार?, समितीबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निर्णय मान्य…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – व्यापार्‍यास बेदम मारहाण करून खंडणी मागणार्‍या दोघांना अटक

National Commission for Safai Karamcharis | केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट