ACB Trap News | महिला समुपदेशक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धाराशिव : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | महिला समुपदेशकास (Female Counsellor) लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द कळंब पोलिस स्टेशनमध्ये (Kalamb Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)

 

नीता सुनिल गायकवाड Neeta Sunil Gaikwad (37, रा. कल्पना नगर, कळंब, तालुका – कळंब, जि. धाराशिव – Dharashiv) असे लाच घेणार्‍या महिला समुदपदेशकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना त्यांचे पती व सासरचे मंडळी यांचेविरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ (Crime Against Woman) करत असले बाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करावयाचा होता (Dharashiv ACB Trap Case). त्याकरीता तक्रारदार यांना समुपदेशन कार्यालयाचा अहवाल आवश्यक होता (Dharashiv Bribe Case News).

 

म्हणून यातील तक्रारदार यांनी तुळजाभवानी जनविकास सामाजिक संस्था, मोहा, तालुका कळंब, जिल्हा-धाराशिव महिला समुपदेशन/मदत केंद्र, पंचायत समिती, कळंब येथील आरोपी महिला हिचेकडे त्यांचे पती व सासरची मंडळी यांचे विरोधात हुंड्या साठी तगादा लावून मानसिक व शारीरिक छळ करत असले बाबत तक्रारी अर्ज दिला होता. त्यामध्ये तक्रारदार यांचे बाजूने कळंब पोलीस ठाणे येथे व कळंब कोर्टामध्ये (Kalamb Court) अहवाल पाठविण्याकरिता यातील आरोपी महिला हिने पंच साक्षीदारासमक्ष दि. 26/06/2023 रोजी फी च्या नावाखाली पूर्वी 1000 रुपये स्वीकारल्याचे मान्य करून 6600 लाचेची मागणी केली व दि. 27/06/2023 रोजी पंचासमक्ष महिला समुपदेशन/मदत केंद्र, पंचायत समिती, कळंब येथे 6,600 रुपये लाच रक्कम स्वीकारली असता नीता सुनिल गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे (ACB Trap News). सदरबाबत पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (DySP Siddharam Mhetre), पोलिस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे आणि नागेश शेरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACB Trap News | Arrest Of Women counselor Neeta Sunil Gaikwad In Bribe Case


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा