ACB Trap News | 9 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय योजने अंतर्गत वडिलांच्या सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) करुन 9 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) येवला तालुक्यातील मौजे सावरगाव येथील मंडळ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहात पकडले. नाशिक एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई गुरुवारी (दि.7) केली.

मंडळ अधिकारी पांडुरंग हांडू कोळी Pandurang Handu Koli (वय – 57), खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ Vithoba Jairam Shirsath (वय-32 रा. मुपो ठाणगांव, तालुका येवला, जिल्हा नाशिक) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या आईचे नाव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजने अंतर्गत वडीलांच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पांडुरंग कोळी यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 9 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap News) तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि.6) पडताळणी केली असता मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी याने 15 हजार रुपये
लाच मागून तडजोडी अंती 9 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
तसेच लाचेची रक्कम खासगी इसम विठोबा शिरसाट यांच्याकडे देण्यास सांगितले.
पथकाने सापळा रचून विठोबा शिरसाट याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यानंतर मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मीरा आदमाने (PI Meera Adamane)
पोलीस अंमलदार प्रवीण महाजन, किरण अहिरराव, प्रमोद चव्हाण, परशराम जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडवर,
10 लाखाची लाच घेणार्‍या बडया अधिकार्‍याची हकालपट्टी