ACB Trap News | 25 हजार रुपये लाच घेताना उपनिबंधक कार्यालयातील मुख्यलिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोसायटीची कामे करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 25 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) भाईंदर तालुक्यातील उपनिबंधक सहकारी संस्थेतील मुख्यलिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. अलीहैदर दगडुमिया शेख Alihaidar Dagdumiya Shaikh (वय-35) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसबीने (ACB Trap News) ही कारवाई मंगळवारी (दि.29) उपनिबंधक सहकारी सस्था ठाणे येथे केली.

याबाबत तक्रारदार यांनी सोमवारी (दि.28) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap News) तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या सोसायटी विरुद्ध नोटीस काण्यासाठी, प्रशासक नेमण्यासाठी तसेच बिल्डिंगचे लेखापरीक्षण (Audit) करण्यासाठी अलीहैदर शेख याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत ठाणे एसीबीकडे (Thane ACB Trap News) तक्रार केली.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता अलीहैदर शेख याने तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 45 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता 25 हजार रुपये स्वीकारताना शेख याला रंगेहाथ पकडण्यात आले. शेख याच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात (Bhayander Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एसीबीच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती

Uddhav Thackeray | “ब्रिटीशही विकास करत होते परंतु आम्हाला स्वातंत्र्यही हवे….” उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र

Sharad Pawar | ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबद्दल शरद पवारांनी दिली माहिती; सामनातील टीकेवर ठाकरेंसमोर दिले उत्तर