Sharad Pawar | ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबद्दल शरद पवारांनी दिली माहिती; सामनातील टीकेवर ठाकरेंसमोर दिले उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | महाराष्ट्रामध्ये उद्यापासून राष्ट्रीय स्तरावरील विरोधीपक्ष नेत्यांची मोठी फौज येणार आहे. मुंबईमध्ये (Mumbai) उद्यापासून विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची (INDIA) बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष व ‘इंडिया’ आघाडीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), कांग्रेसचे नाना पटोले (Nana Patole), अशोक चव्हाण (Ashok Chavan), शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) असे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या दोन दिवसीय बैठकीची माहिती व चर्चा होणाऱ्या विषयांची थोडक्यात माहिती दिली.

महाविकास आघाडीच्या या पत्रकार परिषदेमध्ये इंडिय़ा या राष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या जागा वाटपाबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देत सांगितले की, “’इंडिया’ आघाडीच्या पहिल्या दोन बैठका अतिशय महत्त्वपूर्ण होत्या. आता जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. आता या पुढील बैठकींमध्ये इंडिया आघाडीच्या संयुक्त कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर काही जणांची समिती स्थापन करून राज्यनिहाय स्थानिक पातळीवर आघाडीतील जागांबाबत, इतरांच्या समावेशाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.” अशी इंडिया आघाडीच्या जागावाटपाबद्दल शरद पवार यांनी माहिती दिली आहे.

सत्तेत असणाऱ्य़ा भाजपाकडून (BJP) अनेकदा विरोधातील नेत्यांवर भष्ट्राचाराचा (Corruption)
आरोप करण्यात येत असतो. इंडिया आघाडीतील (India Alliance ) नेत्यांवर भाजपाकडून केल्या जाणाऱ्या भष्ट्राचाराच्या आरोपावर देखील शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “भोपाळमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर टीका केली. त्यात त्यांनी महाराष्ट्र बँक आणि इतर घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यांच्याकडे सत्य असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी आणि सखोल चौकशी करावी. फक्त आरोप करू नये, असा टोला शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.“

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार (Sharad Pawar) असे देखील म्हणाले की
बहुजन समाज पक्षाच्या (Bahujan Samaj Party) मायावती (Mayawati) या कोणासोबत जातील,
हे पाहावं लागेल. त्यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचे सूतोवाच केले असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. सामनामध्ये (Saamana) पवार काका
पुतण्यावर होत असलेल्या आरोपांवर देखील त्यांना उद्धव ठाकरेंसमोर विचारण्यात आले.
यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, “माध्यमांनी आमच्यावर टीका केली तर आम्ही काम करणे थांबवावे का ?”
असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे देखील म्हणाले की,
“आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो.” अशी टिप्पणी ठाकरे यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती