ACB Trap News | न्यायालयाच्या आदेशानुसार फेरफार नोंद करण्यासाठी लाचेची मागणी, महिलेकडून लाच स्वीकारताना तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या फेरफार मध्ये नोंद करण्यासाठी महिलेकडून 9 हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) माण तालुक्यातील शेनवडी येथील तलाठ्याला (Talathi) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. तुकाराम शामराव नरळे Tukaram Shamrao Narle (वय-36 रा. मौजे पानवन, ता. माण. जि. सातारा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई शुक्रवारी (दि.1) म्हसवड येथील ढोर कारखान्यासमोरील रस्त्यावर केली.

याबाबत 28 वर्षाच्या महिलेने सातारा एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या चुलत सासऱ्याची शेनवडी येथे साडेतेरा एकर जमीन आहे. या जमिनीबाबत म्हसवड सिव्हील कोर्टात (Mhaswad Civil Court) दावा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात म्हसवड सिव्हिल जज यांनी 20 जुलै रोजी कोर्टाचा हुकूमनाम्याचा आदेश दिला आहे. हुकूमनाम्यानुसार साडे तेरा एकर जमीन तक्रारदार यांचे पती व दिर यांचे नावे करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार जमिनीच्या फेरफार मध्ये नोंद करण्यासाठी म्हणून शेनवाडी येथील तलाठी तुकाराम नरळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 11 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी याबाबत सातारा एसीबीकडे (Satara ACB Trap News) तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता तुकाराम नरळे यांनी 11 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 9 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार म्हसवड येथील ढोर कारखान्यासमोर रोडवर सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 9 हजार रुपये लाच स्वीकारताना तलाठी तुकाराम नरळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB)
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (Addl SP Vijay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबी पोलीस उपअधीक्षक उज्वल अरुण वैद्य (DySP Ujwal Arun Vaidya)
पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, प्रशांत नलावडे, तुषार भोसले, मारुती अडागळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडले मत; म्हणाले “या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस…”

PM Narendra Modi | मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार का? यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा त्यांचा अधिकार…”