PM Narendra Modi | मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार का? यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा त्यांचा अधिकार…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Narendra Modi | राज्यामध्ये सध्या राजकारण्यांच्या बैठकींचा सपाटा चालू आहे. मुंबईमध्ये राज्यातील सर्व नेते तसेच राष्ट्रीय पातळीवरील विरोधक नेत्यांचा गोतावळा जमला आहे. आज इंडिया (I.N.D.I.A) आघाडीची राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये (Grand Hyatt) बैठक पार पडत आहे तर शिंदे गट ( ShivSena Shinde group), अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि भाजप (BJP) महायुतीची बैठक देखील आज आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ (One Nation One Election) या संकल्पनेची देखील देशभर चर्चा आहे. सर्वत्र राजकीय चर्चा रंगल्या असताना दरम्यान आता पुण्याच्या लोकसभा जागेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील या चर्चेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late MP Girish Bapat) यांच्या मृत्यूनंतर अद्याप या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली नाही. ही जागा रिक्त असून पुढच्या लोकसभा निवडणूकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये (Narendra Modi In Pune Lok Sabha Election) निवडूकीसाठी उभे राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी देखील नरेंद्र मोदी यांना पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्रानंतर चर्चांना वेग आला असून अनेकांना खरचं मोदी हे पुण्यातून निवडणूक लढवणार का या विषयी प्रश्न पडला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईतील (Mumbai) महायुतीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना हा नरेंद्र मोदींचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अजित पवार पंतप्रधान मोदींच्या पुण्यातून निवडणूक लढवण्याबाबत म्हणाले की, “या चर्चेवर प्रश्नचिन्ह आहे. रोज काहीतरी बातम्या येत असतात. मोदींचा स्वत:चा मतदारसंघ पहिल्यापासून गुजरातचा आहे. तरी ते मागे वाराणसीतून निवडून आले आहेत. सुरुवातीला तर दोन्ही मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नावावर दोन्ही वेळेला भाजपाच्या 300 पेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या उभ्या भारताने पाहिल्या आहेत.” असे अजित पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “निवडणुकीसाठी आपण कुठून उभं राहावं हा त्यांचा अधिकार आहे. ही बातमी मी वाचली आहे.
पण त्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे अशा गोष्टीवर आपण कुठे चर्चा करण्यात वेळ घालवायचा? असं मला वाटलं.
तो सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा स्वत:चा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते निर्णय घेतील.”
असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) अनेक भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचा पुणे शहरातील दौरा वाढला आहे.
अनेक नेते हे सतत पुणे शहरामध्ये उपस्थित असलेले दिसून येतात.
पक्षश्रेष्ठींसह महाराष्ट्रातील भाजपा नेते देखील शहरामध्ये उद्घाटन, लोकार्पण यानिमित्ताने पुण्यामध्ये असतात.
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी दगडूशेठ बाप्पांचे (Dagdusheth Halwai Ganpati) दर्शन देखील घेतले होते.
कसबा विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये (Kasba Assembly By-Election) भाजपाच्या उमेद्वाराचा पराभव झाला
असला तरी देखील त्या काळात भाजपाने शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते.
पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त असून त्यावर सुनील देवधर (Sunil Deodhar) इच्छुक असल्याचे बोलले
जात होते. मात्र आता पुढच्या लोकसभा निवडणूकीमध्ये यावर नरेंद्र मोदी हे निवडणूक लढवण्याचे बोलले जात आहे.
भाजपाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे चर्चांना अधिक उधाण आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडले मत; म्हणाले “या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस…”