Ajit Pawar | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडले मत; म्हणाले “या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस…”

पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | केंद्र सरकारकडून ‘वन नेशन वन इलेक्शन’ (One Nation One Election) अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) देखील बोलावले आहे. मोदी सरकारकडून (Modi Government) ही ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील सर्व लोकसभा निवडणूका व राज्यांच्या विधानसभा निवडणूका या एकाच वेळी करण्याचा मानस सरकारचा आहे. याला विरोधी पक्षाकडून जोरदार विरोध केला जात असला तरी देखील सरकारकडून विशेष समिती गठित करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करुन ही समिती त्यांच्या शिफारशी केंद्र सरकारला करणार आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावरुन देशाचे राजकारण ढवळून निघत असताना अजित पवार यांनी सोशल मीडियावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.

ट्वीटरवर ट्वीट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ यावर भूमिका मांडली आहे., ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे असे अजित पवार यांचे मत आहे. ते पुढे म्हटले आहेत की “प्रधानमंत्री महोदयांनी (PM Narendra Modi) वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावं. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे.”

अजित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये देशामध्ये सतत कुठे ना कुठे चालू असलेल्या निवडणूकीमुळे होणारा त्रास व पैशाचा अपव्यय यावर देखील प्रकाश टाकला आहे. ते म्हणाले की, “देशात अनेक राज्यात सातत्यानं कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल.” असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे.

पंतप्रधान मोदीच्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) स्वागत करत असल्याचे देखील
अजित पवारांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, “काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात.
परंतु त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत.
प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं ते धाडस दाखवलं आहे.
केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.
विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ (One Nation, One Tax) हा
निर्णय मोदीजी यांच्या सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला.
त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल असा विश्वास आहे.
मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो.” अशा शब्दांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
(DCM Ajit Pawar) यांनी मोदी सरकारच्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ या मोहिमेचे स्वागत केले आहे.
पण देशभरातून विरोधकांकडून याचा तीव्र विरोध केला जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?, भाजपकडून हालचालींना वेग (Video)