ACB Trap News | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 हजार रुपये लाच घेताना महिला पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पाथरी पोलीस ठाण्यातील (Pathri Police Station) महिला पोलीस हवालदाराला (Female Police Constable) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. संगीता नामदेवराव वाघमारे Sangita Namdevrao Waghmare (रा.पोलीस वसाहत, पोलीस मुख्यालय, परभणी) असे लाच घेताना (ACB Trap News) पकडण्यात आलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. परभणी एसीबीच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि.20) शहरातील ओंकार नगर येथील सुविधा मार्ट या मॉलमध्ये केली.

 

याबाबत 26 वर्षाच्या व्यक्तीने परभणी एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार दिली आहे. यातील तक्रारदार यांच्या घरा समोरील जायकवाडी प्रकल्पाच्या जागेत अतिक्रमण करून तेथे राहणारे व अवैध व्यवसाय करणारे लोकांचा त्रास तक्रारदार यांना होत होता. यामुळे ते उपोषणाला बसले होते. प्रकल्पाचे जागेत अतिक्रमण करून राहणाऱ्या व्यक्तीने तक्रारदार यांच्यावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तक्रारदार यांना त्याच्या विरूद्ध दाखल असणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी महिला पोलीस हवालदार संगीता वाघमारे या लाचेची मागणी करीत होत्या.

 

तक्रारदार यांनी याबाबत मंगळवारी एसीबीच्या (Parbhani ACB Trap) कार्य़ालयात तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता संगिता वाघमारे यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन सुविधा मार्ट या मॉलमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना संगिता वाघमारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. वाघमारे यांच्यावर पाथरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Bribery Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर (DySP Ashok Ipper),
पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे (PI Sadanand Waghmare) पोलीस अंमलदार चंद्रशेखर निलपत्रेवार,
सीमा चाटे, कल्याण नागरगोजे, मो. जिब्राईल, चालक कदम यांच्या पथकाने केली.

 

Web Title :  ACB Trap News | Female police in anti-corruption net while taking bribe
of 5 thousand rupees to help in crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme