ACB Trap News | उताऱ्यावरील शेरा कमी करण्यासाठी लाच स्वीकारताना महिला तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – सातबारा उताऱ्यावरील अज्ञान पालक कर्ता (अपाक) शेरा कमी करुन देण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) जालना जिल्ह्यातील निकळक येथील महिला तालठी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. रेखा पुरुषोत्तम मानेकर Rekha Purushottam Manekar (वय-32 रा. समर्थनगर, जुना जालना) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई गुरुवारी (दि.31) मानेकर यांच्या बदनापुर येथील खासगी कार्यालयात केली.

तक्रारदार यांनी त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील अपाक (Ignorant Parents) शेरा कमी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यावरुन तलाठी यांनी शेरा कमी न केल्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा लेखी अर्ज केला होता. त्यावेळी तलाठी रेखा मानेकर यांनी अपाक शेरा कमी करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जालना एसीबी कार्यालयात (ACB Trap News) तक्रार दिली.

एसीबीच्या पथकाने (Jalna ACB Trap News) प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता रेखा मानेकर यांनी
तक्रारदार यांच्या सातबारा उताऱ्यावरील अपाक शेरा कमी करण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
लाचेची रक्कम मानेकर यांच्या बदनापुर शहरातील हुसेननगर येथील खासगी कार्यालयात स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी रेखा मानेकर यांना
रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर बदनापुर पोलीस ठाण्यात (Badnapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली जालना एसीबीचे पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे
(DySP Kiran Bidve), गजानन घायवट, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, गणेश चेके, ज्ञानदेव जुंबड,
गजानन खरात, अतिक तिडके, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, संदीपान लहाने, जावेद शेख, विठ्ठल कापसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | उदय सामंतांच्या ‘त्या’ आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार; म्हणाले “दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी…”

Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार