ACB Trap News | दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या एकावर एसीबीकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | महावितरण कंपनीने (MSEDCL) आकारलेला दंड कमी करुन देण्यासाठी वीस हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) एका खासगी व्यक्तीवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन हरिश्चंद्र वायकर (वय ३८ वर्ष रा मंचर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी (ACB Trap News) कडे तक्रार केली होती.

तक्रारदार यांचे ड्राय क्लीनिंगचे दुकान (Dry Cleaning Shop) आहे. या दुकानावर महावितरण कार्यालय मंचर यांनी लाईटमीटर मधून अनधिकृत लाईट पुरवठा दुसऱ्या दुकानाला केला होता म्हणून कारवाई करून तकारदार ह्यांना दंड आकारला (Penalty) होता. दंडाची रक्कम महावितरण कार्यालयाचे अधिकारी यांना सांगून कमी करून देतो असे सांगून अर्जुन वायकर याने तक्रारदार यांचेकडे लाच मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे (ACB Trap News) येथे तक्रार दिली होती.

पुणे एसीबीच्या (Pune ACB Trap News) पथकाने प्राप्त तक्रारीची 14 डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली असता खाजगी इसम आरोपी अर्जुन वायकर ह्याने तक्रारदार यांचेकडे स्वतः साठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंचर पोलीस स्टेशन (Manchar Police Station) येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav),
पोलीस निरीक्षक रुपेश जाधव (PI Rupesh Jadhav), पोलीस शिपाई प्रविन तावरे,
महिला पोलीस शिपाई कोमल शेटे, चालक पोलीस हवालदार माळी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची तरंग उत्सवाला भेट; नागरिकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईत! 20 जानेवारीपासून आझाद मैदानात उपोषण, जरांगेंची मोठी घोषणा