Manoj Jarange Patil-Maratha Reservation | मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईत! 20 जानेवारीपासून आझाद मैदानात उपोषण, जरांगेंची मोठी घोषणा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Manoj Jarange Patil-Maratha Reservation | मराठा आरक्षणाचे पुढील आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. येत्या २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. आज मनोज जरांगे यांची बीडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. जरांगे यांच्या या घोषणेमुळे सरकारचे टेन्शन वाढणार आहे. (Manoj Jarange Patil-Maratha Reservation)

बीडच्या सभेत समाज बांधवांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ यांच्या सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे. (Manoj Jarange Patil-Maratha Reservation)

मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. मी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला.

मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

मनोज जरांगे म्हणाले, कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं. कुणाला जाळपोळ करु द्यायची नाही. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही, पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. २० तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा. मी मेलो तरी चालेल मागे फिरणार नाही, असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिला.

जरांगे पुढे म्हणाले, देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतो. एकदा जर मोठा समुदाय खवळला
तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल. माझ्या मराठ्यांना डिवचू नका.

जरांगे म्हणाले, सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये.
आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या.

छगन भुजबळांचे नाव न घेता सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले,
त्याचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर येणारं आंदोलन तुम्हाला जड जाईल.
हा फक्त बीड जिल्हा आहे. अजून महाराष्ट्र बाकी आहे.
जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma Andhare Letter In Sanskrit | ‘तुरूंगवास पत्करेन पण माफी नाही”, सुषमा अंधारेंचे
दिलगिरीऐवजी उपसभापती गोऱ्हेंना संस्कृतमध्ये खरमरीत पत्र

Bachchu Kadu On Shinde Fadnavis Govt | ‘सोयरे’ शब्दावरून बच्चू कडूंनी सरकारला फटकारले;
”दिलेला शब्द पाळता येत नसेल तर…”

Pune Kondhwa Police News | कोंढवा पोलिसांकडून वाहन चोरांना अटक, 8 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस
(Video)