ACB Trap News | 20 हजार रुपये लाच घेताना वनपाल व वनरक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जळावू लाकडांच्या वाहतूक परवान्यावर (Transport License) कारवाई न करण्यसाठी 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) हातकणंगले परिमंडळ वनधिकारी कार्यालयातील वनपाल (Forester) व वनरक्षकाला (Forest Guard) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरवारी (दि.31) करण्यात आली असून दोघांवर एसीबीकडून (ACB Trap News) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

वनपाल रॉकी केतन देसाई Rocky Ketan Desai (रा.बाचणी,ता.कागल,जि. कोल्हापूर), वनरक्षक मोहन आत्माराम देसाई Mohan Atmaram Desai (रा.सुलोचना पार्क, प्लॉट नं.14, ए वार्ड, नवीन वाशीनाका,कोल्हापूर, मुळ रा.कडगाव, ता.भुदरगड, जि. कोल्हापूर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 32 वर्षाच्या व्यावसायिकाने कोल्हापूर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांचा जळाऊ लाकडांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार हे जत (सांगली), सांगोला (सोलापूर) येथून जळावू लाकूड खरेदी करून ते भाड्याने घेतलेल्या गाड्यांमध्ये भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसेच इचलकरंजी येथे घेऊन येतात. याठिकाणी आल्यानंतर त्या भाड्याने घेतलेल्या गाड्या मधील लाकडाची तपासणी न करण्यासाठी. तसेच त्या वाहनातील जळावू लाकडांच्या वाहतूक परवान्यावर कारवाई न करण्यासाठी, त्या गाड्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी मोहन देसाई याने स्वतः साठी व रॉकी देसाई याच्यासाठी तक्रारदार यांचेकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap News) याबाबत तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता वनपाल रॉकी देसाई व वनरक्षक मोहन देसाई यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी रॉकी देसाई यांनी लाच रक्कम आरोपी मोहन देसाई यांच्याकडे देण्यास सहमती देवून लाच देण्याकरता तक्रारदारास प्रोत्साहन दिले. त्यानंतर पथकाने सापळा रचून मोहन देसाई याला तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपींविरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात (Hatkanangle police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB)
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
(Addl SP Sheetal Janve), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी
(Addl SP Vijay Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे
(DySP Sardar Nale), पोलीस निरीक्षक बापू साळुंके (PI Bapu Salunke),
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर (PSI Sanjeev Bambargekar)
पोलीस अंमलदार विकास माने, सुनिल घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, उदय पाटील,
विष्णू गुरव यांच्या पथकाने केली

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | उदय सामंतांच्या ‘त्या’ आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार; म्हणाले “दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी…”

Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार